कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
मूल: दीपक देशपांडे
शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिता वाळके होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री विजय पंडिले नायब तहसीलदार मूल , प्रा.बनकर सर, प्रा. मासिरकर सर,प्रा. डोंगरवार सर उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ.अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला तसेच अण्णाभाऊ साठे यांनी कथा ,कादंबऱ्या , लघुनाट्ये,पोवाडे, कविता इ विविध साहित्यांचे लेखन करून समाजात जनजागृती केली. म्हणूनच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन केले. मान. विजय पंडिले यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यांचा उल्लेख करून त्यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रा.पडोळे, प्रा.चन्ने, प्रा.निखील दहिवले ,प्रा. राहूल बोधे ,प्रा.समीर अल्लुरवार ,प्रा. अमित धोडरे ,प्रा. सागर मासिरकर यांनी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी कु. पूनम मुनगंटीवार ,कु. अनुष्का लेनगुरे ,कु. संजीवनी ठाकरे, कु.श्रुती घीमे या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment