१ऑगस्टपासून सुरू झाला महसूल पंधरवाडा.
१ऑगस्टपासून सुरू झाला महसूल पंधरवाडा.
महसूल विभागामार्फत आयोजन.
दिनांक एक ऑगस्ट २०२४ हा महसूल दिन म्हणून महाराष्ट्र राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय झाल्यानंतर आजपर्यंत त्यानुषंगाने सगळीकडे तो दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जात होता ,नंतर १ ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह म्हणून साजरा केला जाऊ लागला परंतू आता गत वर्षीपासून या महसूल दिनापासून ०१ ते १५ ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरवाडा २०२४ साजरा करण्यात येत आहे.
यावर्षी सदर महसूल पंधरवाड्यामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे :-
दिनांक ०१ ऑगस्ट २०२४”महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह /पंधरवाडा शुभारंभ”तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” याबाबत मार्गदर्शन व अनुपालन करणे.
०२ऑगस्ट२०२४ "मुख्यमंत्री युवा कार्यकर्ते प्रशिक्षण योजना”
०३ ऑगस्ट २०२४ “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” प्रचार व प्रसार.
०४ ऑगस्ट २०२४ “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय” अभियान राबविणे.
०५ ऑगस्ट २०२४ ”कृषी मार्गदर्शन कार्यक्रम”आयोजन.
०६ऑगस्ट २०२४ “शेती पाहणी व महत्वाचे दाखले वाटप.
०७ ऑगस्ट २०२४ “युवासंवाद”
०८ ऑगस्ट २०२४ ”महसूल जन संवाद”
०९ ऑगस्ट २०२४ “महसूल ई प्रणाली”
१०ऑगस्ट २०२४ ”सैनिक हो तुमच्यासाठी”
११ऑगस्ट २०२४ ”आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन”
१२ ऑगस्ट २०२४ ”एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा”
१३ ऑगस्ट२०२४ “महसूलअधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण”
१४ऑगस्ट२०२४:- ”महसूल पंधरवडा वार्तालाप”महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभ” करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि शासकीय विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा हाच या पंधरवाड्याच्या आयोजनाचा ही मुख्य उद्देश आहे.
जनतेच्या हितासाठी या पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून शासन,प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय साधण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे,
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment