महसूल पंधरवाड्याचे आयोजन कुठे औपचारिकता तर ठरणार नाही!

 महसूल पंधरवाड्याचे आयोजन कुठे औपचारिकता तर ठरणार नाही!



दीपक देशपांडे 

दिनांक एक ऑगस्ट २०२४ हा महसूल दिन म्हणून महाराष्ट्र राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय झाल्यानंतर आजपर्यंत  त्यानुषंगाने सगळीकडे  तो दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जात होता ,नंतर १ ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह म्हणून  साजरा केला जाऊ लागला परंतू आता गत वर्षीपासून या महसूल दिनापासून ०१ ते १५ ऑगस्ट  या दरम्यान महसूल पंधरवाडा २०२४ साजरा करण्यात येत आहे.

यावर्षी सदर महसूल पंधरवाड्यामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील राज्य शासनाने जाहीर केला तो पुढीलप्रमाणे :-

दिनांक ०१ ऑगस्ट २०२४”महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह /पंधरवाडा शुभारंभ”तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” याबाबत मार्गदर्शन व अनुपालन करणे.

 ०२ऑगस्ट२०२४  "मुख्यमंत्री युवा कार्यकर्ते प्रशिक्षण योजना” 

०३ ऑगस्ट २०२४ “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” प्रचार व प्रसार.

०४ ऑगस्ट २०२४ “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय” अभियान राबविणे.

०५ ऑगस्ट २०२४ ”कृषी मार्गदर्शन कार्यक्रम”आयोजन.

०६ऑगस्ट २०२४ “शेती पाहणी व महत्वाचे दाखले वाटप.

०७ ऑगस्ट २०२४ “युवासंवाद” 

 ०८ ऑगस्ट २०२४ ”महसूल जन संवाद”

०९ ऑगस्ट २०२४ “महसूल ई प्रणाली”

१०ऑगस्ट २०२४ ”सैनिक हो तुमच्यासाठी”

 ११ऑगस्ट २०२४ ”आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन”

१२ ऑगस्ट २०२४ ”एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा”

 १३ ऑगस्ट२०२४ “महसूलअधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण”

१४ऑगस्ट२०२४:- ”महसूल पंधरवडा वार्तालाप”महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभ” करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

जिल्हाधिकारी स्वतः आणि जिल्हा कार्यालय वगळता इतरत्र मात्र प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही तर शासनाने दिलेला कार्यक्रम केवळ एक औपचारिकता म्हणून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न बहुतांश तालुक्यात सुरु असल्याचे वृत्त आमच्या  वेगवेगळ्या तालुका प्रतिनिधी यांचेकडून प्राप्त होत आहेत ,कारण या पंधरवाड्याच्या आयोजनाची माहिती प्रसिध्दी माध्यमांना देऊन  कोणत्त्या  दिवशी कोणता कार्यक्रम कुठे घेणार याबाबत सविस्तर कार्यक्रमाचे नियोजन करुन त्यांना सहभागी करुन घेत  किंवा पोस्टर बॅनरच्या माध्यमातून जनतेच्या  मनात  जागृती करणे आणि जनतेच्या दरबारात हे कार्यक्रम आयोजीत करुन जनसहभाग वाढविणे हा उद्देश कुठेही पूर्ण होतांना दिसत नाही. यासाठी तालुका कार्यालयात वा परिसरात अशा कार्यक्रमाचे आयोजनाचे साधे बॅनरही झळकताना वा माहितीसाठी लागलेले दिसत नाहीत ,मग जनतेपर्यंत ह्या आयोजनाची माहिती पोहोचणार कशी ?असा प्रश्न जनता आमच्या प्रतिनिधी ंसोबत वार्तालाप करताना उपस्थित करत होती.

काही तालुक्यातील तहसीलदार व अधिकारी यासाठी प्रयत्न करीत आहेत,मात्र एकाचवेळी आलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडताना हे कार्यक्रम पार पाडणे अत्यंत कष्टप्रद असून अतिवृष्टीमुळे  पिके वाहून गेलेली असताना पीक पंचनामे ,लाडकी बहिण योजनेसाठी विविध दाखले व ऐन रोवण्याच्या काळात शेतकरी व शेतमजूर कामात व्यस्त असल्याने यांत जनसहभाग फार तोकडा मिळत असल्याचे आमचे ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून प्राप्त अहवालानुसार आढळून आले आहेत , परिणामी हे आयोजनच कुठे औपचारिकता ठरते की काय अशी शंका जनता बोलून दाखवत आहे.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.