राजकीय पक्ष आणि राजकीय नेतेमंडळी अजूनही कोणत्या भ्रमात....?
राजकीय पक्ष आणि राजकीय नेतेमंडळी अजूनही कोणत्या भ्रमात....?
दीपक देशपांडे
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडली आणि तेथील यशापयशाची योग्य कारणमीमांसा झाली असून महाविकास आघाडी पासून महायुती पर्यंतच्या घटक पक्षातील इच्छुक दावेदारांनी कंबर कसली असून नव्या जोशाने आणि जोमाने बऱ्याच दिवसांपासून लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार या दिवसांची वाट बघणारी मंडळी दंड थोपटून प्रचाराचा श्रीगणेशा करीतमैदानात उतरलेले दिसताहेत आणि शक्ती प्रदर्शन करीत आपणच कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
पण....... बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात......
महायुतीतील,. प्रमुख दावेदार......भाजपच्या गोटात,मुळात या युतीचाच विरोध असून त्यांचेकडे नेतृत्व असुनही विश्वास गमावलेले नेते व विश्वास गमावलेल्या कार्यकर्त्यांची फळी त्यामुळे ना जनसंपर्क ना मजबूत पक्षसंघटन त्यामुळे जो काम करेल त्यांच्यासोबत निघालेले मतदार अशा स्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ही निवडणूक पुन्हा लढणार अशी आशा असताना ना पदाधिकारी बदलाची गरज, ना नव्याने काही समिकरणे जुळविली जातील अशी माहिती पुढे येत असताना सारे कसे आलबेल असल्याचा केवळ दिखावा करणे सुरु असल्याने लोकसभा निवडणुकीत ४८,००० मतांची पिछाडी कशी भरून काढायची व विजय मिळवून आणण्यासाठी कशी व्युहरचना करायची हाच खरा चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळे जमीनीस्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे .
पण.....
याकडे कोणालाच लक्ष देण्याची आवश्यकता वाटत नाही.
तिकडं काॅंग्रेसच्या गोटात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे गोटातील गटबाजीचा प्रश्न उफाळून आला असून आपणच कसे योग्य, आणि मीच खरा पात्र उमेदवार असल्याचा कांगावा अनेक इच्छुक उमेदवार करीत असून एकमेकांवर कुरघोडी करीत दावे, प्रतिदावे करीत नवमतदार नोंदणी पासून गावागावात व घराघरात कुटूंबियांशी गाठीभेटी करणे तर कुठे बचतगट महिला मेळावे व या माध्यमातून महिलांना सक्षम होतांना बघून आनंद व्यक्त करीत आहेत तर कुणी भुतकाळात केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत तर कुणी महिला असल्याने मीच तुमची तारणहार असल्याचे दाखवून देत आहे तर कुणी आजपर्यंत रस्ते ,बगीचे बसस्थानकाचे काम म्हणजे विकास केला म्हणजे नेमकं काय केलं? असा प्रश्न विचारत ते काम अजूनही अपूर्ण असल्याचा दावा करीत व बेरोजगारी व कामांची गरज व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे बोलून दाखवत सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उबाठा शिवसेनेच्या वतीने कुठे कार्यकर्ता मेळावा, स्पर्धा आणि कार्यकर्ते बैठक व यानिमित्ताने पक्षसंघटना मजबूत करण्याचा, वेळप्रसंगी आकस्मिक अडल्यानाडल्यांना प्रासंगिक मदतीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न जनतेत कौतुकाचा विषय ठरत आहे ,असे वाटत असतानाच जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकारी यांचेकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,व तोच विषय चर्चेत आहे.
राष्ट्रवादी चे तुणतुणे मध्येच वाजते आणि मध्येच कुठे गायब होऊन जाते,हे कुणालाच कळत नाही ,पण यावेळेस घड्याळाची टिकटिक की तुतारी यातच अडकलेत नेते आणि कार्यकर्ते.
वंचितचा तर तोराच न्यारा.. निवडणूक तर जाहीर होऊ द्या मग बघू....?
सगळेच राजकीय पक्ष आपल्या परिने प्रयत्न करताहेत,करणाराहेत पण यश कुणाला मिळणार? मतदार आपले मत कशासाठी आणि कुणाकडे बघून कुणाला मत देण्यासाठी मतदान केंद्र गाठणार? हे येणारा काळच स्पष्ट करणार असला तरीही जनतेचा उत्साह आतापासूनच अजून काहितरी मिळायला हवे, काहितरी बदलायला हवे यासाठी तयार होणे ही काळाची गरज आहे,यांचा समस्त मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे,
शासनाच्या वेगवेगळ्या योजना, प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहिण, लाडका भाऊ व शेतकऱ्यांना मोफत विज योजना यासोबतच यावर्षी पीकविमा योजना व त्याचा नेमका लाभ कसा व किती मिळणार यावर या योजना नेमक्या किती प्रभावी ठरतील हे प्रश्न मात्र निवडणूक निकाल लागेपर्यंत अनुत्तरितच असणार आहे, कारण निवडणूक प्रचारात कोण कोणता मुद्दा घेऊन मैदानात उतरणार यावरच पुढील निर्णय अवलंबून असणार हे निश्चित आहे.
त्यासाठी सगळे पक्ष व इच्छुक उमेदवारांनी मतदार राजाच्या घराचे उंबरठ्यावर उभे होते दार उघडण्यासाठी दारावर थाप दिली आणि म्हणताहेत ....दार उघडं ,मतदार राजा दार उघडं.
तुर्तास एवढेच.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment