तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १२३ प्रकरणांना मंजुरी

 तहसील कार्यालय कोरपना येथे संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १२३ प्रकरणांना मंजुरी 


चंद्रपूर,दीपक देशपांडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या  बैठकीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार अध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थिती श्री प्रकाशजी वटकर तहसीलदार साहेब,श्री मनोहर कुळसंगे सदस्य,चिडे नायब तहसीलदार, सौ लक्ष्मीताई कुळमिथे सदस्य,सौ रंजनाताई मडावि सदस्य, श्री नारायण राठोड सदस्य,श्री सुरेश टेकाम सदस्य,श्री बाबाराव पोहनकर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.


बैठकीत संजय गांधी विधवा निराधार,अपंगनिराधार, परितक्त्या, सिकलसेल, दुर्धरनिराधर,अविवाहित निराधार, श्रावण बाळ निराधार,वृद्धापकाळ निराधार अशा विवीध योजनेतील १२३ पात्र लाभार्थ्यांना मंजुरी  देण्यात आली नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले बैठकीत लाभार्थ्याच्या मंजुर यादीवर बैठकीची तारीख टाकावी,ज्या लाभार्थ्यानां मंजुरी मिळाली त्याच लाभार्त्थाची यादी फलकावर प्रसिद्ध करावी,मंजूर यादीत लाभार्थी कमी जास्त करु नये,थकीत लाभार्थ्यांचे पैसे त्वरित खात्यात टाकावे,बोगस प्रकरणे घेवु नये,संजय गांधी निराधार योजनेतील बाबु, कर्मचाऱ्यांनी निराधार,गोर,गरीब,संजय गांधीनिराधार लाभार्त्थांसी प्रेमाने बोलावे व वागावे अशा अनेक प्रकरणांना उजाळा दिला. सदस्य गण व तहसीलदार साहेब यांच्या उपस्थितीत १२३  प्रकरणांना मंजुरी देण्यात आली बैठकीला मोलाचे सहकार्य सुरणार बाबु,सौ मालेकर मॅडम,सलीम भाई यांनी केले तर आभार मनोहर कुळसंगे यांनी मानले.


दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.