रुसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले!
रुसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले!
मूलतालुक्यातीलकालपरवापर्यंचे पर्जन्यमान चिंताजनक?
दीपक देशपांडे
नैऋत्य मोसमी वारे दरवर्षी पेक्षा लवकर धडकतील अशी आशा पार धुळीत मिळवून हवामान खात्याच्या अंदाजाला खुंटिला टांगून यावर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसाने सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी चिंता वाढविली असून मध्यंतरी चांगली हजेरी लावली तेंव्हा शेतीच्या मशागतीसाठी वेग आला होता मात्र या लहरी पावसावर अवलंबून शेतातील पिके कशी जगवता येतील याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे, आणि वरुन सूर्य आग ओकतोय त्यामुळे उपलब्ध पाण्याची वाफ होऊन शेतात मशागत करताना घाम गाळावा लागत आहे.
एकीकडे सिंचनाच्या सुविधा मर्यादित असतांनाच धानासारख्या अती पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते आणि पावसाने दडीमारल्याने शेतकरीचिंताग्रस्त होत असतो, कारण शासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास ३००मिलिलिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे,मात्र मूल तालुक्यातील कोणत्याही छोट्या मोठ्या जलाशयात फारसा पाणीसाठा उपलब्ध नाही.
तहसील कार्यालय मूल अंतर्गत जलमापन केंद्रातील नोंदी
दिनांक,१०/०७/२०२४
१) मूल - २७.१
२) बेंबाळ - ६.१
3) चिखली - १३.३
सरासरी- १५.५
आतापर्यंत - ३१३.६ अशा आहेत. यानंतरच्या दोन दिवसांत पावसाची स्थिती नसल्यागतच आहे.
आणि दरवर्षी साधारण ११००-१२०० मिलिलिटर पावसाची सरासरी असतांनाच २५% हून अधिक पाऊस पडून गेला आहे , आणि अजूनही दिवसा उन्हं उन्हाळ्यासारखी तिव्रता घेऊन जमिनीची धूप वाढवित असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास कित्येक शेतकऱ्यांना दूबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे ,कारण जेंव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा घाईगडबडीत धानाचे पऱ्हे ओलाव्यात टाकले गेले त्यामुळे बरेचशे दाणे कोंब येऊन माती खाली दबून राहिले होते,मात्र पावसाने दडी मारल्याने ते कोंब आलेले दाणे अंकूर फुटून बाहेर येऊ शकले नाहीत तर काही दाणे चिमण्या पाखरांनी टिपून घेतल्याने उगवणाच्या प्रमाणात घट झाली आणि सुरुवातीला ज्यांच्या पेरण्या झाल्या होत्या त्यांना रोवणी साठी पाण्याची आवश्यकता आहे मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली असून निसर्गाच्या या अवकृपेमुळे तो आता नेमकं काय करायचं ह्या विवंचनेत सापडला आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️



Comments
Post a Comment