मूलमध्ये भाजपचे सेतू सुविधा केंद्र उद्घाटन सोहळा संपन्न
मूलमध्ये भाजपचे सेतू सुविधा केंद्र उद्घाटन सोहळा संपन्न.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज मोफत भरुन देण्यासाठी प्राधान्य.
दीपक देशपांडे
महाराष्ट्र शासनाच्या आँनलाईन सेतू सुविधा केंद्रातील गर्दी आणि होत असणारी छुपी लूट तसेच आँनलाईन आपले सेवा केंद्रातून सुरु असणारी लूट थांबविण्यासाठी आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे मोफत अर्ज भरुन देण्यासाठी या सेतू सुविधा केंद्राचा उपयोग होणार आहे यासाठी हे केंद्र भाजपचे मूल बल्लारपूर चे आमदार व महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मूलमध्ये मूल- चंद्रपूर मार्गावर ॲक्सीस बॅंकेच्या बाजूला
*मोफत आँनलाईन सेतू सुविधा केंद्र* सुरू करण्यात आले असून ह्या केंद्राचे नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रविवार दिनांक ७/७/२०२४ रोजी रितसर उद्घाटन करण्यात आले.
ह्या केंद्राचे माध्यमातून जनतेला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे मोफत अर्ज भरुन देण्यासाठी प्राधान्यक्रमाने उपयोग केला जाणार असून इतर सर्व प्रकारच्या शासनाच्या वतीने दिले जाणारे सर्व प्रकारचे दाखले अगदीच नि:शुल्क स्वरूपात दिले जाणार असल्याचे सांगितले जात असले तरीही हे दाखले प्राप्त करण्यासाठी शासनाने नेमुन दिलेले शुल्क संबंधित लाभार्थ्यांना आकारले जाणार आहेत ,म्हणजे शासकीय दरांत हे दाखले जनतेला मिळण्याचा मार्ग या सेतू केंद्रातून साकारला जाणार असून मध्यस्थ व दलालांच्या तावडीतून ग्राहकांना आपली सुटका करून घेता येणार असून हे केंद्र प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व नवनवीन यंत्रसामग्रींनी सुसज्ज करण्यात आले आहे.
या उद्घाटनप्रसंगी आपल्या कर्मचाऱ्यांना सुचना देताना येणाऱ्या ग्राहकांना ,त्यांची मागणी नेमकी काय? याबाबत विचारणा करुन त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची आणि कुणीही नाराज होणार नाही याप्रकारे त्याची समजूत घालून समाधान करण्यात आले पाहिजे,अशी सक्त ताकीद सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून देण्यात आली.
या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment