अतिवृष्टीमुळे नुकसान!शासन,प्रशासन लागले कामाला, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये.
अतिवृष्टीमुळे नुकसान!शासन,प्रशासन लागले कामाला, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये.
ग्राहक पंचायत मूल.
मूल सावली, दीपक देशपांडे.
जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाच्या रेड आणि ऑरेंज अलर्टने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आणि आता शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करताना यंत्रणा युद्धपातळीवरती कार्य करीत आहे.पीक पाण्याखाली गेले अजूनही पूर ओसरलेला नाही, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासकीय यंत्रणेने भातपीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात केली असून, मोक्यावर जाऊन पिकांचे छायाचित्रे मोबाईल जीपीएस टॅग मुळे शेतकऱ्याची व कृषी विभाग अधिकारी व कर्मचारी शेतीचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणेने कंबर कसली आहे.
दिनांक २३/०७/२०२४ मौजा आकापूर उर्फ बिजापूर ता.सावली तालुका कृषी अधिकारी सावली श्री.डी. आर. पानसे साहेब ता.कृ.अ. सावली यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशान्वये श्री.पी. के. जोंधळे कृषी सहायक / कु. चैताली दुधे कृषी सेविका कृषीमित्र श्री राहुल आगडे व इतर शेतकरी उपस्थित होते.
तर मूल तालुक्यात तहसीलदार मृदूला मोरे मॅडम याच्या आदेशानुसार दिनांक २४/०७/२०२४ रोजी शेतीचे पंचनामे हळदी गावगन्ना वेडीरीठ हळदी tukum येथे *पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहेत त्याच्या शेतामधील सर्वे करताना ग्रामसेवक रामटेके मॅडम आणि रोजगार सेवक भाविक कारडे आणि ऑपरेटर हेमंत भूरसे आणि शेतकरी अमर कोठारे योगेश घोंगडे दौलत घोंगडे क्षितिज शेडमाके*
मोक्काचौकशी करुन शेतकऱ्यांना दिलासा देता यावा यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहे , तरीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मोक्यावर उपस्थित राहून सहकार्य करावे ,व काही शेतकरी यातून सुटले असल्यास त्यांनी तलाठी यांचेकडे तसा अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे तर पंचायत करताना अधिकाऱ्यांनी कुठलाही दुजाभाव न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची खरी खरी नोंद करावी व नंतर शेतकऱ्यांना ओरड करण्याची वेळ येऊ नये असे आवाहन दीपक देशपांडे, अध्यक्ष ग्राहक पंचायत मूल यांनी प्रशासकीय यंत्रणेला केले आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment