बा,वरुणदेवा!आता तरी उघाड दे!

 बा,वरुणदेवा!आता तरी उघाड दे!

दीपक देशपांडे 

एकदा पाऊस येऊन गेला नंतर उघाड पडली आणि शेतकऱ्यांसह सगळी जनता उष्णतेमुळे पावसाची अपेक्षा करु लागली , आणि हो नाही म्हणता म्हणता पावसाने बरसायला सुरुवात केली ती अशी की वर्षभराची सरासरी तो पार करु लागला, परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या मेहनतीला आणि पैशाला अक्षरशः पाण्यात वाहून जाताना उघड्या डोळ्यांनी बघायची वेळ आली. 

अविरत कोसळलेल्या पावसामुळे  जनजीवन विस्कळित झाले, रहदारी बाधित झाली, जनतेच्या घरात पाणी शिरले आणि त्यांचे जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य, दैनंदिन वापराचे‌ साहित्य कपडालत्ता खराब झाल्याने ते रस्त्यावर आले , शेतकऱ्यांनी  शेतातील पेरणी, रोवणी केलेली पीके वाहून गेलीत, अनेकांच्या  डोक्यावर छप्पर राहीले नाही ,सारेच शासनाच्या मदतीची अपेक्षा करु लागले ,यात राजकारण्यांनी आपली पोळी शेकण्याचा  फायदा करुन घेत आम्हीच तुमचे तारणहार असल्याचे भासविण्याचा पुरेपूर   प्रयत्न केला. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अर्थसहाय्य मिळावे अशी सरकारदरबारी मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून जनतेच्या मनात सहानुभूती पेरण्याचाही  प्रयत्न केला गेला.घरांची पडझड झालेल्या नागरिकांना अर्थसहाय्य देण्याची मागणी करीत आपल्याकडून काही प्रमाणात अर्थसहाय्य करुन प्रसिद्धी माध्यमातून आपलीच पाठ थोपटून घेण्याचेही प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आणि घडत आहेत.

शासन प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीची पाहणी करून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात तत्परता दाखवली आणि काही प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले  आणि देण्यासाठी  प्रस्ताव सादर  केले जाताहेत , मंजूर निधीचे लवकरच  वाटप करण्यात येणार आहे.

उद्यापासून ते लाभार्थी,क्षतीग्रस्त नागरिकांना याचा लाभ मिळायला सुरुवात होणार आहे याच पार्श्वभूमीवर, वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी एकदमच सक्रिय होऊन माझ्याच पाठपुराव्यामुळे  ही तातडीने मदत दिली जात असल्याचा दिखावा ही करु शकतील , नियोजनाच्या अभावात नुकसानग्रस्त एखाद्या कुटूंबाला मदत मिळाली तर ती सगळ्याच राजनेत्यांकडून मिळाली आणि नाही मिळाली तर एका कडूनही नाही मिळाली या आशयाचे वृत्त आमच्यापर्यंत येऊन धडकत आहे , त्यामुळे जर या साऱ्याच राजकीय मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक कर्तव्य जोपासत प्रशासनाला सहकार्य करुन एकत्रीत मदत केली असती तर क्षतीग्रस्त नागरिकांपैकी कुणी या मदतीपासून वंचित राहिला नसता परंतू आम्हाला आमचीच इमेज तयार करायची असते मग आम्ही कुठून तुमचा विचार करणार?ह्या भुमिकेमुळे असे घडले असण्याची दाट शक्यता आहे.असो.

आज संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे आणि पावसाच्या कोसळधारा थांबण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे कदाचित उद्याची परिस्थिती मागील आठवड्यापेक्षाही भयंकर असू शकते ,खोलगट भागात पाणी भरु शकते ,घरांची पडझड होऊ शकते ,रस्ते वाहतूक प्रभावित होऊन शेकडो प्रवासी आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकणार नाहीत शेतकऱ्यांची उरलीसुरली पीके पुन्हा एकदा पाण्याखाली येऊन त्यांची भयानक स्थिती होऊ शकते या साऱ्या बाबी विचारात घेऊन पुढिल नियोजन करण्याची नितांत आवश्यकता आहे. शासन प्रशासन याबाबत तत्पर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राजकीय, सामाजिक संघटनांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्भवणाऱ्या परिस्थितीत सर्व भेदभाव  दूर सारून जनसेवेसाठी तयार राहण्याची तयारी करायला हवी आहे, कदाचित त्यांनी ही तयारी पूर्ण केलेली असू शकते अशी आपण अपेक्षा करुयात ,कारण लवकरच विधानसभा निवडणुका आहेत.

हे सारे योग्य असले तरीही एक प्रार्थना आपण सगळे मिळून करु शकतो,ती म्हणजे ही उपरोक्त तयारी आणि उपरोक्त परिस्थिती येवूच नये म्हणुन वरुण देवाला साकडे घालून जनसेवा आणि दिखाऊ मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा एक आर्जव करु यात,.....   बा,वरुणदेवा!आता तरी उघाड दे! आम्हाला सूर्यदर्शन घडू दे, तुझ्या लेकरांना स्वस्थ राहू दे, शेतात पीक येऊ दे , सोन्याच्या राशी बळीराजाच्या दारात येवू दे,मजूरांना काम मिळू दे ,व्यापाऱ्यांचे व्यवसाय निट चालू दे,सगळ्यांनाच पावसाचा आणि जगण्याचा आनंद  घेता येऊ दे ,अर्ध्या वाटेत अडलेल्यांना त्यांच्या  नियोजित स्थळी पोहोचू दे, आम्हीच या देशाला आणि देशवासियांना भरभरून प्रेम करु व परस्परांना सहकार्य करु,ही भावना मनामनात रुजू दे. कारण देव,दानव व मानव यांत फक्त प्रयत्न आणि विश्वासावर हे जग अजूनही उभे आहे.

कुणाचा विश्वास असेल किंवा नसेल ,हाच त्यावरचा एक अंतिम पर्याय आहे,असे आमचे  स्पष्ट मत,(अर्थातच वैयक्तिक मत) आहे, विश्वास , माणुसकी  आणि प्रेम हेच शेवटी अंतिम सत्य  आहे.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.