भरकटलेल्या चितळाला जीवन दान,

 चितळाला जीवन दान,संजिवन पर्यावरण संस्था आणि वनविभागाचे संयुक्त प्रयत्न!

मूल, दीपक देशपांडे 

आज दिनांक  २६ जूलै रोजी शूक्रवारी हकाळी ६:४५ चे दरम्यान कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर  व्यायाम करणा-या काही मुलांना रेल्वे क्वार्टर जवळ एका नर चितळाच्या मागे काही कुत्रे लागलेले दिसले होते.. आणि त्यांनी चितळाला किरकोळ जखमी केले असल्याचे निदर्शनास आले..ही माहिती त्यांनी वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्यांना दिली .

 वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली (प्रादेशिक) प्रिंयका वेलमे मॅडम यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक, संस्थेचे सदस्य व मैदानावरील  तरूणांनी अथक परिश्रमाने चितळाला पकडले व डाॅक्टर संदिप छौनकर यांनी जखमी चितळावर प्राथमिक उपचार केले व त्याला सुरक्षित पणे जंंगलात सोडण्यात आले.. यावेळी वनरक्षक सूधिर ठाकुर, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्नील आक्केवार, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे, विशाल टेकाम, सोनु नागोशे,रंजन गोटेफोडे, विशाल मडावी,बादल नागोशे, आदित्य गंगेवार, रोहित तांगडे,सुरज मडावी,चिकु निकोडे, प्रफुल कोल्हे,खुशी तांगडे,श्रध्दा शेंडे,अंजली शेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले...

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.