सारे काही नगरवासियांच्या मदतीसाठी.

अतिवृष्टीमुळे घरात पाणी घुसलेल्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी,

माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या वतीने मागणी


दीपक देशपांडे 

माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तसेच इंडिया २४ न्यूज चॅनेल च्या वतीने अतिवृष्टिमुळे बाधित मूल शहरातील वॉर्ड क्रमांक १४ मधील युवाशक्ती व्यायाम शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता खूपच दयनीय परिस्थिती पहावयास मिळाली. नागरिकांचे घरात पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणावर दैनंदिन जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झालेले आहे.घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावू शकतो.सबंधित बाधित कुटुंबातील नागरिकांना शासकीय मदत पुरविण्यात यावी व त्यांचे आरोग्याचे दृष्टीने पर्यायी व्यवस्था करण्यात यावी यादृष्टीने सन्मा.मोरे मॅडम तहसीलदार मूल यांना श्री. कुमरे साहेब नायब तहसीलदार यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.यावेळी डॉ्.आनंदराव कुळे कार्यकारी अध्यक्ष मूल तालुका, प्रवीण भरतकर मूल शहर अध्यक्ष ,संजय चिटमलवार सचिव मूल शहर, श्रीकांत आंबटकर उपाध्यक्ष मूल तालुका ग्रामीण,राजू रामटेके सचिव मानवाधिकार, ओमदेव मोहुरले सामाजिक कार्यकर्ता, .कोरडे,जयंत मोरांडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.