मूल तालुक्यातील पुरपरिस्थितीचा आढावा.

मूल तालुक्यातील पुरपरिस्थितीचा आढावा.

पावसाचा अतिरेक, आजपर्यंतच वार्षिक सरासरीच्या ६०%पाऊस, अजूनही अर्ध्याहून अधिक पावसाळा शिल्लक.


दीपक देशपांडे 

"आमचे पूर्वज नेहमी म्हणायचे ,चार महिन्यांचा उन्हाळा आणि एक दिवसाचा पावसाळा",कधी यावर विश्वास ठेवला असेल नसेल माहिती नाही परंतू काल सकाळपासून आज सकाळपर्यंतच्या पावसाच्या कोसळधारांनी आज ते वाक्य आठवलं आणि जूने लोक किती दूरचा विचार करायचे याची आठवण झाली.

Tahasil off.Mul

 Date -21/07/2024

1) Mul         -      247.1

2) Bembal  -      198.5

3) Chikhali  -      191.0

  SARASARI -     212.2

Progressive  -    785.7

मूल शहरात काल दिनांक २०जूलै ते आज २१जूलैच्या सकाळी ७वाजेपर्यंत २४७.१मिलिमिटर पावसाची नोंद तर तालुक्यात २१२.२मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मूल शहरातील अनेक वार्डातील अनेक घरांमध्ये पाणी साचले असून विस्तारीत मूल शहरातील अनेक जून्या  व नववस्तीमधे  पावसाचे पाणी साचले असून येण्याजाण्यास मोठी अडचण येत आहे.तर अनेक खोलगट भागात अनैकांच्या घरात पाणी भरले असून रहिवाशांना घरातील पाणी बाहेर झोकण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करावे लागत असून काही भागात तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे

याबाबतीत काही राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी प्रयत्न करीत असून  प्रशासनासोबत आम्हीच कार्यरत असून जनतेच्या सेवेत तत्पर असल्याचा दिखावा करीत  त्याची प्रसिद्धी  करीत आहेत, तर कुणी आम्हीच जनतेचे पालनहार असा दावा   केला  व सरकारने मदत करावी अशी मागणी केली त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून आता जनता हे उघडपणे बोलून दाखवत आहे परिणामी   भाजप कार्यकर्तेच नाही तर अनेक सेवाभावी संस्था व शासकीय अधिकारी त्याच प्रमाणे सुसंस्कृत नागरिक यांच्या प्रयत्नातून पुर परीस्थिती आटोक्यात आणली आहे त्यामुळे कुणीही श्रेय घेण्याची धडपड करू नये,अशा आशयाच्य प्रतिक्रिया  समाज माध्यमांवर उमटू लागल्या आहेत.

यादरम्यान आम्ही पावसाने थोडी उसंत दिल्यामुळे पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर  पडलो.सुरुवात केली मूल मारोडा मार्ग,मूल चंद्रपूर,मूल चामोर्शी मार्ग,मूल गडचिरोली,मूल नागभिड नागपूर मार्गावरील वाहतूक व्यवस्था व  प्रशासनाच्या सहभागाचा आढावा घेतला असता मूल मारोडा मार्गावर मूलच्या तलावाच्या ओव्हरफ्लो मुळे मार्गावर प्रचंड पाणी वाहत असल्याचे आढळून आले ,या परिस्थितीत लोक मोठ्या उत्साहात  यांचा आनंद घेत होते आणि या  मार्गावर आजवर कधिही असा प्रकार बघितला नसल्याचे स्पष्ट करीत होते .

मूल चंद्रपूर मार्गावर आगळीनजीक तलाव भरल्याने रस्त्यावर पाणी आल्याने रहदारी बाधित झाली होती तर तिकडे पलिकडे, चिचपल्लीचे मामा तलाव फुटल्याने गावात पुरपरिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याचे वृत्त हाती आले असून ,मूल चामोर्शी मार्गावर जून्या पुलावर माणुसभर पाणी वाहात असल्याचे व नवीन पुलावर पाणी नसूनही नदी पलीकडे एका छोट्या नाल्यावरुन पाणी वाहात असल्याने नवीन पुलाजवळच कठडे लावून वाहतूक अडवून ठेवल्याने , याठिकाणी वाहने व बघ्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. एक शिपाई इथे तैनात दिसला.
मूल नागभीड,मूल गडचिरोली मार्गावर उमानदीला वाढत असलेल्या पाण्यामुळे आधी अडवून ठेवलेली वाहतूक मूल शहरालगतच्या महाराष्ट्र राईस मिल जवळ अडवण्यासाठी व कोणालाही नाहक त्रास होऊ नये व जिवीत हानी टाळता यावी यासाठी मूलच्या तहसीलदार मृदूला मोरे आपल्या  काही सहकाऱ्यांसोबत गर्दी करीत पाण्यात उतरणाऱ्या वा पाण्यातून रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अडवून मागे परत फिरवताना आढळून आल्या ,यांत त्यांच्या मदतीला दोन तिन सहकाऱ्यांशिवाय पोलिस प्रशासनातील कुणिही आढळून आले नाहीत 

मात्र आम्ही त्यांना एक प्रश्न केला ,मॅडम, तुम्ही स्वतः इथे ?तर त्या म्हणतात , जनतेला जीवाशी  खेळू द्यायचे नाही म्हणून आम्हाला हे करावे लागत आहे,इतर कुणाची वाट बघितली तर हे लोक  आत पाण्यात शिरतील व काही अनुचित घटना घडली तर जनता आम्हालाच नावे ठेवतील म्हणून आम्हाला ही कार्यवाही जनहित  लक्षात घेऊन करावी लागत आहे,कारण नदीचे पाणी सतत वाढतच आहे.

तिकडे तालुक्यातील जूनासुर्ला गावात नदीचे पाणी शिरल्याने गाव पुरात बुडाल्याने वृत्त आहे ,या पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरादारांचे व शेतीचे प्रचंड नुकसान  झाले असल्याचे वृत्त  हाती येत आहे,तर प्रशासनाने पुन्हा अतिवृष्टी चा इशारा दिला आहे, त्यामुळे भितीचे सावट पसरले आहे. जनता जीव मुठीत घेऊन वावरत आहे,


तालुका प्रशासनाचे वतीने तहसीलदार मृदूला मोरे यांनी जनतेने आवश्यक असेल तरच विशेष काळजी घेऊन घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे टाळा, पडझडीची तातडीने माहिती द्या ,काही अडचण उद्भवल्यास प्रशासनाला कळवा,प्रशासनाने गावातील शाळांमध्ये आकस्मिक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत , त्यामुळे  जनतेने काळजी घ्यावी व सहकार्य करावे असेही त्यांनी आवर्जून आवाहन केले आहे.

तसेच आवाहन पोलिस प्रशासनाने एका पत्रकाद्वारे स्वतंत्रपणे केलेले आहे.


*दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक*

*✍️Ddbatmiportalm2m✍️*




Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.