नगरपरिषद राबवतेय मच्छरांचा नायनाट करण्यासाठी मोहीम.
नगरपरिषद राबवतेय मच्छरांचा नायनाट करण्यासाठी मोहीम
दीपक देशपांडे
हा एक स्तुत्य उपक्रम असून त्याची ठराविक कालावधीनंतर पुनरावृत्ती करीत डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केला जावा अशी मागणी जनता करीत आहे.
आम्ही मोकाट जनावरे, मोकाट डुकरांचा बंदोबस्त,डासांचा प्रादुर्भाव, नाल्यांची स्वच्छता, उकिरडे याबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला असता ही बाब पुढे आली असून जागोजागी डुकरांच्या असण्याने घाण पसरण्यास व रस्त्याने चालताना त्रास होत असल्याची बाब उजागर झाली असून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी पुढे आली आहे ,तर मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम किमान महिनाभरात एकदातरी राबविण्यात यावी अशी जनतेची अपेक्षा आहे, त्याशिवाय यावर प्रतिबंध घालता येणार नाही असेही जनता पोटतिडकीने सांगत होती.
नगर प्रशासन कोणतीही मोहीम हाती घेते आणि त्याचा पाठपुरावा न करता अर्ध्यावर सोडून देत असल्याने दुसऱ्यांदा ती मोहीम राबवताना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते व अडचणी येतात , त्यामुळे कोणत्याही प्रकारची मोहीम ही सातत्याने राबवावी अशी बोलकी प्रतिक्रिया यानिमित्ताने पुढे आली आहे.
नगर प्रशासन याबाबत निश्चित विचार करुन त्यावर अंमल करेल ,अशी आशाही जनतेच्या दरबारात वार्तालाप करताना आम्हाला जनता जनार्दन बोलून दाखवत असताना जनसहभाग आवश्यक असल्याचे आम्हाला प्रकर्षाने आढळून आले आहे.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments
Post a Comment