अखेर पिक विमा योजनेला मुदतवाढ.
अखेर पिक विमा योजनेला मुदतवाढ.
मुंबई : न्यूज ब्युरो /दीपक देशपांडे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली.
धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये काय काय म्हटलं? केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपला पीकविमा ३१ जुलै पर्यंत भरून घ्यावा.. केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शिवराज चव्हाण साहेब यांचे मनस्वी आभार व्यक्त केले आहे.
ही मुदतवाढ मिळाली यासाठी चंद्रपूर चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी कृषी मंत्र्यांना पत्र पाठवून मुदतवाढ देण्याची मागणी केली होती आणि आम्ही ती बातमी प्रसिद्ध केली होती ,हे विशेष.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmiportalm2m✍️


Comments
Post a Comment