वनातील अधिवास आणि खुली रहदारी वन्यप्राणी व मानवाला घातकच!
वनातील अधिवास आणि खुली रहदारी वन्यप्राणी व मानवाला घातकच!
मूल:दीपक देशपांडे.
मूल चंद्रपूर मार्गावर मूल पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डोनी फाट्यानजीक चंद्रपूर ला जाणाऱ्या एका कार वर रस्ता ओलांडताना सांबराने उडी मारली आणि तो सांबर कारच्या सामोरील काचेवर दि. १३ जुलै २०२४ ला दुपारी ४ वाजता धडकला. या अपघातात सांबर गंभीर जखमी झाले आणि कारचे पण भरपूर नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच एफडीसीएम चिचपल्लीचे वनपरिक्षेत्रअधिकारी एस. बी. बोथे यांचे मार्गदर्शनात वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी सांबराला मूल येथे उपचारासाठी वाहनात आणतांना त्याचा मृत्यू झाला.
अपघातात मृत झालेले सांबर मादि असुन वय जवळपास दोन वर्ष होते. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप छौनकर यांनी मृत सांबराचे शवविच्छेदन केले व नंतर दहन करण्यात आले. यानिमित्ताने वन्यप्राण्यांच्या वनातील भ्रमंती व मानवी रहदारी यांचा ताळमेळ बसवत रस्त्यालगत तारांच्या कुंपणाची आवश्यकता पुन्हा एकदा किती आवश्यक आहे हे उजागर झाले असून किमान वन्यप्राण्यांच्या अधिवास क्षेत्रात तरी रस्त्याच्या कडेला कुंपण करणे गरजेचे असल्याची मागणी पुढे आली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांच्या वाघ,बिबट,अस्वल,सांबर,चितळ,रानगवा,निलगाय यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध बफर झोन व कोअर झोनमधून जाणारा हा महामार्ग असल्याने वनविभाग व पर्यावरण रक्षक ही बाब किती गांभीर्याने घेणार याकडे सर्वसामान्य जनतेला उत्सुकता असून वन्य प्राण्यांचे रक्षण व्हावे व रहदारी बाधित होऊ नये ही सगळ्यांचीच इच्छा आहे,मात्र हा रस्ताच मुळात वनविभागाच्या हद्दितून जात असल्याने त्याच्या रुंदिकरणाचा प्रश्न वर्षानुवर्षे अधांतरी लटकत पडला आहे,ही बाब ही विसरता येणार नाही, आणि म्हणूनच यावर सुयोग्य तोडगा काढणे अत्यावश्यक आहे,अशी एक चर्चा मूल नगरीत व आसपासच्या परिसरात ऐकायला मिळत आहे .* दीपक देशपांडे मुख्य संपादक, ✍️Ddbatmiportalm2m✍️.
Comments
Post a Comment