२०२३चा पिक विमा तातडीने मिळावा.


शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम तातडीने मिळावी,                          प्रकाश पाटील मारकवार

सरसकट पिक विम्याचा लाभ द्या,                                    संतोष रावत.




दीपक देशपांडे 

प्रकाश पाटील मारकवार,माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे वतीने मान. नामदार एकनाथराव शिंदे,सुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना एक पत्र सादर करीत पिक विम्याची रक्‍कम तात्काळ देण्याबाबत मागणी केली आहे.

या पत्रात ते ,लिहितात ,महोदय ,पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत चंद्रपुर जिल्हयातील शेतकऱ्यांना ११२ कोटी रुपयाचा निधी अजून पर्यंत मिळालेली नाही. पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई साठी अर्ज केला होता या हंगामात धान , कापूस व सोयाबीन या पिकाचे अवकाळी पाऊस व रोगांमूळे नुकसान झाले.

ओरियन्टल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचा विमा उतरविला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे व विम्याची रक्‍कम न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हा निधी चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा ,ही विनंती !         

   ...आणि हे पत्र त्यांनी  समाज माध्यमांवर वायरल केले असून  मागील काही  दिवसांत  पिक विमा शेतकऱ्यांना  तातडीने  मिळावा यासाठी  विविध  शेतकरी , सामाजिक , राजकीय  संघटना  पुढे सरसावल्या  असून वेगवेगळ्या  माध्यमातून  ही मागणी  पुढे  रेटली  जात आहे .


कालपरवाच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी,एका पत्राद्वारे केली होती ,अशा आशयाची बातमी समाजमाध्यमांवर फिरत आहे.

दुसरीकडे , मुख्यमंत्री  आणि  सत्ताधारी  पक्षातील  नेतेमंडळी  शेतकऱ्यांना  पिक विम्याचा लाभ मिळणारच असल्याचे वारंवार स्पष्ट करीत आहेत.

यावरुन पिकविम्याला आधार  बनवत श्रेय मिळविण्याच्या प्रयत्नात सारेच राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी गुंतले असुनही काहीकाही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतांना दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत, त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे व याच संधीचा फायदा करुन घेण्यासाठी सारेच धडपडत आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️











Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.