सावधान ! *दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतली....स्टेट बँकेने मागितली माफी.
ग्राहक राजा जागा हो.
सावधान ! दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतली....स्टेट बँकेने मागितली माफी....!
दीपक देशपांडे
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गारगोटी, तालुका भुदरगड ही एक कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पातळीवरील मोठी शाखा आहे. या शाखेत दररोज नेहमी गर्दी असते आणि पूर्ण तालुक्यातील शेकडो ग्राहक विविध कामासाठी येत असतात.
काही दिवसापूर्वी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते श्री प्रशांत शरद पुजारी रा. गारगोटी हे दुपारी त्यांच्या एटीएम कार्ड संबंधातील एका कामासाठी सदर शाखेत गेले असता पूर्ण बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आपापल्या कामाच्या जागेवर नसल्याचे दिसले. उपस्थित ग्राहकांना आणि सिक्युरीटी गार्डना विचारले असता सर्व अधिकारी/कर्मचारी जेवायला गेल्याचे त्यांना समजले. त्यावेळी बँकेत बरेच ग्राहक ताटकळत कर्मचाऱ्यांची वाट बघत बसल्याचे दिसले. पूर्ण बँकच रिकामी बघून श्री प्रशांत पुजारी यांनी शाखा व्यवस्थापक यांच्याकडे जाऊन सदर बाब सांगायला गेल्यावर तिथे शाखा व्यवस्थापक ही त्यांच्या केबिन मध्ये उपस्थित नव्हते. वास्तविक RBI नियमानुसार बँकेला दुपारच्या जेवणाची पूर्ण सुट्टी नसते. ग्राहकांच्या सेवेसाठी किमान एक तरी कर्मचारी ड्युटीवर असावा लागतो.
सदर शाखेतील कर्मचारी अधिकारी यांची बेफिकिरी बघून श्री प्रशांत पुजारी यांनी सरळ RBI ला मेल करून सविस्तर पुराव्यासह रीतसर तक्रार केली. RBI कडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी बँकिंग ओंबड्समन यांच्याकडे तक्रार पाठवली. ओंबड्समन यांनी SBI च्या महाव्यवस्थापक यांना यासंदर्भात नोटीस पाठवून सविस्तर खुलाशासह कार्यवाही करण्याबाबत विचारणा केली.
त्यानंतर sbi च्या अती वरिष्ठापासून ते शाखा व्यवस्थापक पर्यंत बँकेतील सर्व सूत्रे पटापटा हलली. गारगोटी शाखा व्यवस्थापक यांनी बँकेत ताबडतोब स्टाफ मीटिंग घेवून पुन्हा अशा चुका होऊ नयेत आणि ग्राहकांच्या सेवेच्या बाबतीत हयगय होणार नाही अशा प्रकारचा सक्त ताकीद देणारा कार्यालयीन आदेश काढला आणि तुम्हाला तसेच इतर ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही माफी मागत आहोत असा फोन करून श्री प्रशांत पुजारी यांना सांगितले आणि तसे लेखी ईमेलपत्र ही पाठवले....
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो या उक्तीप्रमाणे अधिकारी/कर्मचारी यांच्या बेजबाबदार आणि बेफिकीर कार्यशैलीला वेळीच लगाम घातला नाही तर ते अंगवळणी पडून ग्राहकांना नाहक मनस्ताप होतो, त्रास होतो. सदर बाबीची वेळीच दखल घेवून स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लावल्याबद्दल ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते श्री प्रशांत शरद पुजारी रा. गारगोटी यांचे तालुक्यातून, परिसरातून अभिनंदन होत आहे.
=====================
ग्राहक राजा जागा हो.
आपल्या गावातील, शहरातील कोणत्याही बॅंकेच्या एखाद्या शाखेत असा प्रकार आढळला तर आपणही तक्रार करुन न्याय मिळवून शकतो , त्यासाठी आपण बॅंकेच्या शाखेत तक्रारीसाठी वरीष्ठ अधिकारी यांचा किंवा विभागातील मुख्य शाखेचा तक्रार दाखल करण्यासाठी मोबाईल नंबर किंवा टोल फ्री क्रमांक दिलेला असतो ,त्यावर तक्रार करायला आणि अन्यायाविरुद्ध दाद मागायला सुरुवात तर करुन बघायला हरकत नाही, सुरुवात तर करुन बघा,न्याय नक्की मिळणार याबाबत खात्री बाळगा ,असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या मूल तालुका शाखा मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी समस्त ग्राहकांना केले आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*. *✍️Ddbatmiportalm2m✍️*
.jpg)
Comments
Post a Comment