*लपलेलं ते गवसलं.....भाग १ ""त्या" आगीचे नेमके रहस्य काय?
*लपलेलं ते गवसलं.....भाग १.*
"त्या" आगीचे नेमके रहस्य काय?
चंद्रपूर, दीपक देशपांडे
सगळीकडे निवडणूक धामधूम,व मतदानाची तयारी सुरू असतानाच पोलिस व प्रशासकीय चोख बंदोबस्त असतांनाच अठरा एप्रिल च्या मध्यरात्री म्हणजेच १९ एप्रिल रोजी १२-१२.३० वाजता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या ग्राहकतक्रारनिवारण आयोगाच्या इमारतीच्या मागील भागात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे ,तेथे परिसरातील छोटेमोठे झाडे तोडून काही लाकडे ढिग लावून तर बरीचशी इतस्ततः पसरलेली आहेत,त्याठिकाणी आग लागून झालेल्या शार्ट सर्किटमुळे चंद्रपूर ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सर्विस लाईनसह इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची आकडेवारी मात्र कळू शकली नाही.
एरवी छोटीशी घटना घडली तरी त्याचा मोठा इश्यू केला जात असतांना या एवढ्या मोठ्या घटनेबाबत, पहिल्या दिवशी हात झटकू बघणाऱ्या बांधकाम विभाग, विज वितरण कंपनी आणि जिल्हा प्रशासन यांनी धावपळ करुन अतीशिघ्रतेने आगीने जळालेले मिटर बदली करुन ,केबल व कनेक्शन सह दुरुस्ती काम करुन दिले , यात प्रशासन नेमकी कोणती बाब लपविण्याचा प्रयत्न करीत होते? की संबंधित कंत्राटदारांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू होते हे मात्र कळू शकले नाही.
ग्राहक आयोगाच्या कामकाजावर मात्र त्याचा परिणाम झाला होता हे सत्य ग्राहक आयोगात चौकशीअंती पुढे आले आहे.
विज वितरण कंपनी, बांधकाम विभाग व प्रशासन याबाबत निश्चित असा कार्यवाही अहवाल व आगीची सुयोग्य कारणमिमांसा करुनआग लागण्याचे मुळ कारण व त्यामुळे झालेले नुकसान ,व त्यांच्या भरपाईसाठी कोणती व कशी तरतुद केली आहे हे स्पष्ट करणार ,की ....अळीमिळी गुपचिळी....म्हणत कशाहीप्रकारे हे प्रकरण बाहेर न आणताच संपवून टाकले जाणार? याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळाली.
थोड्या चौकशीअंती आग लागली होती ह्याची पुष्टी झाली , काही फोटोही हाती लागलेत मात्र त्याचे कारण कळू शकले नाही.
या आगीचे नेमकं सत्य काय ते उजागर होणार काय? कधी व कसे?
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment