चंद्रपूर परिमंडलातील ३४ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गौरव
चंद्रपूर परिमंडलातील ३४ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण
चंद्रपूर, दीपक देशपांडे
महावितरणच्या चंद्रपूर, गडचिरोलीसह चंद्रपूर परिमंडलातील सर्व कार्यालयात बुधवारी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा झाला. महावितरणच्या बाबुपेठ येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ३४ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात महावितरणच्या बारामती परिमंडलातील मोरगाव येथे वीज ग्राहकाच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या श्रीमती रिंकू बनसोडे या महिला कर्मचा-याला श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली. संपुर्ण कार्यकाळात उत्कृष्ट काम करणा-या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी आपल्या मनोगतात तांत्रिक कर्मचारी हे महावितरणच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे नमूद केले. यावेळी चंद्रपूर मंडलाच्या अधीक्षक अभियंत्या संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) रवींद्र वांदिले, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रामचंद्र वैदकर, चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, बल्लारशा विभागाचे सत्यदेव, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवार, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) सुशील विखार, यांचेसह अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर परिमंडलातील ६ गुणवंत यंत्रचालक आणि २८ तांत्रिक कर्मचा-यांना यावेळी सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त कर्मचा-यांमध्ये चंद्रपूर मंडल कार्यालयाचे ३ यंत्रचालक व १३ तांत्रिक कर्मचारी तर गडचिरोली मंडल कार्यालयाचे ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कर्मचा-यांचा समावेश आहे.
पुरस्कार प्राप्त गुणवंत कामगार
चंद्रपूर मंडल - सुनिल भोयर, शरद ठावरी, सुशिल जनबंधू, महेंद्र चहारे, विनायक वैद्य, अशोक चुनारकर, प्रभुदास चिवंडे, चेतन खारीकर, जितेंन्द्र त्रीपटवार, मनिषकुमार रामटेके, राजेन्द्रे बनोत, प्रेमानंद गौरकार, सुरज माटे, रमाकांत दडमल, पंढरी चौधरी आणि माधव खिरटकर,
गडचिरोली मंडल - केशव मेश्राम, आकाश नखाते. दिनेश दुबे, नेताजी वाघ, संजय चौधरी, मंगेश काळे, रविंद्र सुर्तेकर, संदिप भांडारकर, बालकृष्ण कोवे, राजु मोहर्ले, दामोदर मडावी, ताडुदास गलबले, मंगेश जांभुळे, उमदेसिंग बिस्ट, शामु जोगई,सुदाम मिसाळ, मेघराज रामटेके, आणि हरिपाल रामटेके,
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक* *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment