बारावीच्या निकालाची टक्केवारी आश्चर्यकारक! तरीही टक्का घसरला???
बारावीच्या निकालाची टक्केवारी आश्चर्यकारक! तरीही टक्का घसरला???
दीपक देशपांडे
मूल:- तालुक्याचा बारावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. यांत शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही माघारलेले नाहीत,हेच सिद्ध होत असून विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळालेले भरघोस गुण हे त्यांनी मोठमोठ्या शहरांमध्ये सुरु असलेल्या कोचिंग क्लासेस मधील समर्पित शिक्षण प्रणालीचा वापर करुनही प्राप्त गुणांचा विचार करता टक्का घसरल्याचा दावा या व्यवस्थेशी जवळचे नाते असणारे शिक्षक आणि पालकांनी आमचे सोबत चर्चा करताना स्पष्ट केले.
आजवर या शाळांमधून शिक्षण घेणारै विद्यार्थी स्थानिक शिक्षकांकडे शिकवणी घेऊनही गुणांचा विचार करता अधिक सरस ठरायचे मात्र लाखो रुपये खर्च करुन मोठमोठ्या शहरांमध्ये नामवंतांचे कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेऊनही आज कुठेतरी माघारल्याचे त्यांना दिसत आहेत ,आणि या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज शिक्षक व पालकांनी व्यक्त केली आहे.
दोन वर्ष स्थानिक शाळा महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेऊन कोचिंग क्लासेसमधून शिक्षण घेऊन स्थानिक शाळा महाविद्यालयाचे नाव मोठे करण्याच्या चढाओढित खऱ्या शिक्षणाचा दर्जा खालावत चालला असल्याची ओरड विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
तालुका मूल
शाळा/महा. परीक्षार्थी. उत्तीर्ण टक्के
१. कर्मविर ज्यु, मूल. (कला) १८९ १८१ ९५.७६ वाणिज्य) ८५ ८५ १००
२.नवभारत सायन्स. (विज्ञान) २३७ २३३ ९८.३१
३.आनंद ज्यु, बेंबाळ. ( कला) ११४ ११० ९६.४९
४. नवभारत ज्यु, राजोली. (कला) ७९ ७६ ९६.२०
५. विश्वशांती ज्यु, मारोडा (कला). ६३ ६२ ९८.४१
६. आर्ट्स, कॉम., सा. चितेगाव (कला). २४ २१. ८७.५०
७. जनसेवा, नांदगाव. (कला). ५७ ५७ १००.०
८. डॉ. गन्लावार, गडीसुर्ला
(कला). ३६. ३६ १००.००
९. स्व. वि. कोमलवार,चिरोली. (कला). १७. १२. ७०.५८
१०. देवनिल क. महा. मूल. (कला). ४३ ३८ ८८.३७
११. संत तुकडोजी महा. चिखली (कला). ३३ ३३ १००.०
१२. शरदचंद्र पवार, भेजगाव (कला). ४० ३७ ९२.५०
१३. सिदार्थ विज्ञा. बेंबाळ
(विज्ञान). ९४ ९४ १००.००
१४. आदिवासी आश्रम, नांदगाव (कला). २२ २२ १००.००
१५. माउंट कान्व्हेंट ताडाळा (विज्ञान). ८२. ८१ ९८.७८
१६. महा. गांधी ज्यु. .(विज्ञान). ८० ७९ ९८.७५
(कला). ०७ ०५ ७१.४२
१७. कर्मविर ज्यु. (व्होके). ३२ ३० ९३.७५
१७. नवभारत सायन्स. (व्होके). ४१ ४१ १००.००
एकूण १३७५ १३३३ ९६.९४
अशा पद्धतीने तालुक्यातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांचतील निकाल घोषित झालेला आहे आणि हा निकाल टक्केवारी जरी वाढवताना दिसत असला तरी त्याचा टक्का निश्चितच घसरणीवर जातांना दिसत आहे,हे अधिक स्पष्ट करीत आहे.
उत्तिर्ण विद्यार्थी ,त्यांचे कष्टकरी शिक्षक,जिवांचा आटापिटा करणारे पालक या सगळ्यांचेच अभिनंदन व स्वागत करीत भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा . दीपक देशपांडे
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment