मूलची जिप शाळा हायटेक करा, मिलिंद खोब्रागडे यांची मागणी.

 मूलची जिप शाळा हायटेक करा, मिलिंद खोब्रागडे यांची मागणी.

मूल, दीपक देशपांडे 


चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच जिल्ह्यातील १२ शाळा हायटेक करण्याचा निर्णय घेतला होता ह्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करीत मूल न.प.चे माजी सभापती व नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी स्थानिक गांधी चौकात असलेल्या  जिपच्या शाळेच्या जून्या इमारतीच्या बाहेरुन  स्वस्थ वाटणाऱ्या परंतू आतून पोखरलेल्या  व एकुणच दुरावस्थेकडे लक्ष वेधत ह्या शाळेत गोरगरिबांची मूलेमूली शिक्षणासाठी येत असतात त्यामुळे ह्या जिर्ण झालेल्या शाळेची इमारत नव्याने बांधून ही शाळा देखील हायटेक करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नाम.सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.

व्हाट्सअप गृप वरील एका संदेशात त्यांनी सर्वप्रथम  ही मागणी केली आणि नंतर लेखी निवेदनही सादर केले आहे.

मा. सुधीर भाऊ चे सर्व प्रथम अभिनंदन  भाऊ तुमच्या मुळे आज जिल्ह्यातील 12 शाळा होणार हायटेक या मुळे पुन्हा एकदा.अभिनंदन पण भाऊ मूलची गांधी चौक मधिल जिल्हा परिषद शाळा हि खुप जुनी शाळा आहे. खुप जिर्ण अवस्था आहे या शाळेला सुध्दा निधी मिळवून  हायटेक शाळा बनवा. भाऊ कारण ईथे गोरगरीबांचे. मुल मुली शिक्षण घेतात हिच विनंती  .                                                               आपलाच आज्ञाधारक  माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे.

त्यांच्या मागणीला मूल शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिले असून  खाजगी शाळांच्या वाढिव शुल्कामुळे त्रस्त नागरिकांकडून जिपच्या शाळा अधिक सशक्त व सुखसोयींनी परिपूर्ण करण्याची मागणी जोर धरुन समोर येत आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.