*कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सतरावी बैठक संपन्न*

 *कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सतरावी बैठक संपन्न* 

*मूल १६* : दीपक देशपांडे 

 कृषी महाविद्यालय, मूल आयोजित *सतरावी* शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक १६ मे २०२४ रोजी ग्रामपंचायत *चिखली ता. मूल जि. चंद्रपूर* येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल चे *सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, उपसरपंच श्री. दुर्वास कडस्कर,*  शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “खरीप पिकांचे नियोजन” या विषयावर चर्चा करण्यात आली. 

यामध्ये सर्वप्रथम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी त्यांनी तांत्रिक पद्धतीने शेती करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांना पटवून सांगितले तसेच गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचे व पंदेकृवि विकसित विविध पिकांच्या वाणांची लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले व शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संबंधित विषयावर साधक बाधक चर्चा केली. *डॉ. विजय राऊत,* कृषि विद्या शास्त्रज्ञ यांनी खरीप पूर्व हंगामचे नियोजनाविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व विद्यापीठ विकसित पिडीकेव्हि तिलक व पिडीकेव्हि एच एम टी या धानाच्या वाणाबद्दल माहिती दिली. गादी वाफा पद्धतीने धान रोप कसे तयार करावे व त्याचे काय फायदे आहेत याबद्दल माहिती दिली व धानाची लागवड शात्रोक्त पद्धतीने कशी करावी तसेच या पिकात तण व खत व्यवस्थापन या बद्दल माहिती दिली. गांडूळ खत व व्हर्मिवाश वापराचे पिकांना होणारे फायदे तसेच बायोडीकम्पोझर ची संकल्पांना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. उद्यानविद्या  शास्त्रज्ञ  *डॉ. स्वप्नील देशमुख* यांनी खरीप हंगामातील भाजीपाला लागवड या विषयी संपूर्ण माहिती दिली. यामध्ये वांगी, मिरची, टोमॅटो यांची निरोगी रोपे गादी वाफ्यावर कशी व केव्हा तयार करायची व त्याची लागवड कधी करावी याबद्दल माहिती दिली. टोमॅटो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी पिकाला बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा तसेच कारली, दोडके, गिलके इ. वेलवर्गीय पिकांसाठी मंडप पद्धतीचा वापर करून भरघोस उत्पादन कसे घ्यायचे याबद्दल मार्गदर्शन केले. भाजीपाला पिकांमध्ये बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करून बुरशिजन्य रोगांपासून पिकांचे रक्षण करावे, भाजीपाला पिकात आच्छादनाचे, माती परीक्षणाचे तसेच फुलपिकांची लागवड करण्याचे फायदे समजावून सांगितले. कृषी वनस्पती शास्त्रज्ञ *डॉ. राहुल चहान्दे* यांनी बीज प्रक्रिया म्हणजे काय, ती कशी करतात, त्याचे फायदे, बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, बियाणांचे विविध प्रकार, विद्यापीठाने प्रसारित केलेले धानाचे वाणाबद्दल सविस्तर माहिती दिली. किटकशास्त्रज्ञ *डॉ. अर्चना बोरकर* यांनी शेतकऱ्यांनी कीड व्ययवस्थापनासंबंधीत विचारलेल्या विविध समस्यांचे उपाय सांगितले. सूक्ष्म अन्न घटकांची कमतरता व रोग किंवा कीड यामधील फरक कसा ओळखायचा व त्यावर काय उपाययोजना करायच्या याबाबत सखोल माहिती दिली. विस्तार शिक्षण विषयतज्ञ *डॉ. प्रीती दातीर* , यांनी विद्यापीठाद्वारे प्रसारित होणाऱ्या कृषी संवादिनी चा वापर करून विद्यापीठाने शिफारस केलेल्या पद्धतीने धान व कपाशी व्यतिरिक्त ओवा व जिरा यासारख्या पिकांची लागवड करावी, पिकांच्या सुधारित वाणांची लागवड करावी तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे जेणेकरून शेतीतील उत्पन्न वाढवण्यासोबतच शेतमालाची उत्तम गुणवत्ता राखण्यास मदत होईल असे याप्रसंगी सांगितले. सदर कार्यक्रमास एकुण *३४ शेतकरी व शास्त्रज्ञ* उपस्थित होते. डॉ. प्रीती दातीर यांनी सदर कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*.           *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.