सीबीएसई दहावीचा निकाल:-मूलच्या सेंट अँस कान्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची शतकी सलामी.
सीबीएसई दहावीचा निकाल:-मूलच्या सेंट अँस कान्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची शतकी सलामी.
मूल –दीपक देशपांडे 
ईशान राचर्लावार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च, २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. मूलमधील शाळांमधून २० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत… शहरातील श्रीमंतांची शाळा म्हणून ओळख असलेल्या या शाळेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी १००टक्के आहे.
ईशान संतोष राचर्लावार यांस इय्यता १० वी च्या परीक्षेत ९६.०४ % टक्के गुण प्राप्त झाले,त्याला मिळालेल्या अतुलनीय यशाबद्दल आणि मुल तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल ईशानचे अभिनंदन !आणि शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस खुप – खुप शुभेच्छा दिल्या जात आहेत त्याचवेळी गाव खेड्यातील सुखसोयी नसलेल्या शाळांमधून असा निकाल लागला तर ती खरी अभिमानाची बाब असेल असाही एक सूर ऐकायला मिळाला ,आणि गाव खेड्यातून शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणे आवश्यक असल्याची मागणी पुढे आली असून हे कोणी छापणारच नाही अशा उपरोधिक स्वरात संतापाने तो ऐकायला मिळाला.
Riya Mahadane, Shivam Kundawar. ,Naitik Agarwal
93%. 92.6% 91%
हे आहेत काही उत्तीर्ण विद्यार्थी.
अखेर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल सोमवारी १३ मे रोजी जाहीर केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे.
सिबीएसई बोर्डात दहावीला २१ लाख विद्यार्थी
सिबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल २०२४ च्या निकालाची टक्केवारी ९३.६% आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण परीक्षार्थींची संख्या २२,३८,८२७ आहे. यापैकी २०,९५,४६७ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ऑनलाइन मार्कशीट्स तात्पुरत्या असतील. विद्यार्थ्यांना मूळ मार्कशीट आणि प्रमाणपत्रे नंतर शाळा प्रशासनाकडून मिळेल ,असे बोर्डाने कळविले आहे.
जि.प.मराठी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची यानिमित्ताने स्तुती करण्यात आली असून या जि.प.शाळांमधील शिक्षकांनी आपल्या पाल्यांना याच शाळांमधून शिक्षण देण्याची एक मागणीही यानिमित्ताने पुढे आली आहे.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक* *✍️Ddbatmiportalm2m✍️*
Comments
Post a Comment