अवैधरीत्या रेतीतस्करीला लगाम लावण्याचा प्रयत्न!

 अवैधरीत्या रेतीतस्करीला लगाम लावण्याचा प्रयत्न!


मूल,दीपक देशपांडे 

मूल तालुक्यातील उमा नदीच्या उश्राळा घाटावर अवैधरित्या रेतीचा उपसा करून गैरमार्गाने वाहतूक करुन विकण्याचा प्रयत्न करत असतांना महसुल विभागाच्या पथकाने चार ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने अवैध रेती व्यासायीकांचे धाबे दणाणले आहे???

मूल तालुक्यातील मारोडा- पेटगांव मार्गावरील उश्राळा गावालगत असलेल्या उमानदीच्या घाटावरून मोठया प्रमाणांत रेतीचे उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती महसुल विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रेती उपसा करणा-यांवर आळा घालण्यासाठी नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे यांचे नेतृत्वात भरारी पथक तयार करण्यांत आले. तयार करण्यांत आलेल्या भरारी पथकातील मंडल अधिकारी संजय कानकाटे, दीपक गोहणे, तलाठी शंकर पिदुरकर आणि महेश पेंदोर यांनी आज पहाटे ४ वाजता पासून उश्राळा रेती घाटालगत पाळत ठेवली. पाळतीवर असतांना चार ट्रॅक्टर सदर रेती घाटावर रेतीचा उपसा करण्यासाठी आले. दरम्यान ८.४० वा. चे दरम्यान भरारी पथकाने धाड मारत रेतीने भरलेले तीन आणि रेती भरण्याचे उद्देशाने उभा असलेला एक असे चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरबाबत अधिक माहिती घेतली असता सदर ट्रॅक्टर मारोडा येथील सचिन गुरनूले, विकास चौधरी, बाळु मंडलवार आणि श्रीकोंडावार यांच्या मालकीचे असल्याचे समजले. 
भरारी पथकाने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात आणले असून नियमानुसार कारवाई करण्यांत येत आहे. ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर पैकी दोन ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नसुन बांधकाम पुर्ण करण्यासाठी अनेकांना रेतीची आवश्यकता असल्याची संधी साधुन तालुक्यातील अनेक मंडळी रेतीचा अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. हे विशेष

, महसुल विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईने रेतीचा अवैध उपसा करतांना तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले त्यामुळे 
 रेती व्यावसायीकांचे धाबे दणाणले,असे सांगितले जात आहे,पण...... खरंच असे होत आहे काय?


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.