निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१० कडू कारले ,तूपात तळले,साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच!

   निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१०.

   कॉंग्रेसची  स्थिती म्हणजे  कडू कारले ,तूपात तळले,साखरेत घोळले  तरीही कडू ते कडूच!  पंतप्रधान नरेन्द्र मोदी.


दीपक देशपांडे 

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील या समरांगणातील निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीर मुनगंटीवार व   चिमूर-गडचिरोलीचे उमेदवार   अशोक नेते यांच्या प्रचारासाठी चंद्रपूर येथे आले होते.

आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना माता महाकालीच्या चरणी प्रणाम करीत  व चंद्रपूरकरांना नमन करून नवी दिल्ली येथील नवीन संसद भवनात ज्या चंद्रपूर च्या सागवानाचे दरवाजे लागले आहेत आणि अयोध्येतील राममंदिरात सुद्धा याच च़ंद्रपूरचे  सागवानाचे लाकूड वापरले आहे याचा आवर्जून उल्लेख करताना सुधीर मुनगंटीवार व अशोकनेते यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करतांना चंद्रपूर व गडचिरोलीकरांना  या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे व प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी काॅंग्रेसच्या कार्याची तुलना मराठीतील एक म्हण "  कडू कारले ,तूपात तळले, साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच!" अशी कॉंग्रेसची  स्थिती असल्याचे प्रतिपादन करीत आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आणि आजवरच्या कार्याची व भविष्यातील विकासाची व अपूर्ण कार्याच्या व विकासाच्या संकल्पनेसाठी या उमेदवारांना निवडून देण्याचा आग्रह केला.

यासाठी उपस्थित  प्रचंड जनमानसांना त्यांनी मोदींचा एक संदेश *त्यांचा नमस्कार* प्रत्येक घरोघरी पोहोचविण्याची विनंती केली. व महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याची मागणी केली.

याप्रसंगी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार सुधीर मुनगंटीवार, अशोक नेते, माजी मंत्री शोभा फडणवीस, महायुतीच्या घटक पक्षातील नेतेमंडळी प्रामुख्याने उपस्थित होते ,आज मेघांनी आकाश भरुन आल्यामुळे सूर्याची प्रखर किरणे नव्हती त्यामुळे अथांग पसरलेल्या शेतीवजा सभास्थळी जनतेची प्रचंड संख्येने उपस्थिती  होती.

निवडणूक समरांगणातील महाराष्ट्राच्या भूमीत  पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची ही पहिलीच प्रचारसभा होती , आणि या समरांगणातील नरेंद्र मोदी हेच तर खरे लढवय्ये सरसेनापती आहेत, म्हणूनच रामदास आठवलेंपासून वणी-आर्णीचे उमेदवार व महायुतीच्या सर्व सहभागी पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.