उत्पादन शुल्क जाहीर करा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची मागणी

 उत्पादन शुल्क जाहीर करा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची मागणी,प्रांताध्यक्ष शामकांत पात्रीकर 


चंद्रपूर,नागपूर  दीपक देशपांडे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रापासून दूर असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या वतीने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना विदर्भ प्रांत अध्यक्ष शामकांत पात्रीकर  यांनी जेष्ठ संपादक मोरेश्वर बडगे यांच्यासोबत केलेल्या वार्तालापात कोणत्याही वस्तुंची बाजारात विक्री करताना त्या वस्तुंची अधिकतम विक्री मुल्य नाही (कारण यांत छुपी लुट समाविष्ट आहे),तर त्या वस्तुच्या उत्पादनासाठी लागलेले उत्पादन मूल्य जाहीर करावे म्हणजे ग्राहकांची होणारी फसवणूक सहजगत्या टाळता येणे सहज शक्य आहे. अशी मागणी केली आहे.

https://www.youtube.com/live/QR0pWtQfXtY?si=RbBjDjUKnXegGo9R

या देशातील सर्वसामान्य  व्यक्तीसोबतच   पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा  ग्राहक असल्याने  याबाबत सर्वप्रथम उत्पादन मुल्य जाहीर करुन  ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यानिमित्ताने केली आहे,तसेच ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक ९०दिवसांत करण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांची भरती करुन न्यायदान प्रक्रिया वेगाने राबविली जावी अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

.*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

  1. ग्राहक पंचायत महाराष्ट्र चांगले काम करीत आहेत.या समुहात आपल्या सारख्या क्रियाशील व्यक्तींचा समावेश आहे.यामुळे ग्राहकांना न्याय मिळवून देऊ शकतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.