निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....८.

 निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....८.

भाजपाचे संख्याबळ वाढतेय तर काँग्रेसमध्ये दिलजमाई !

दीपक देशपांडे 

१३चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीसाठी निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून वेगवेगळ्या पक्षातील गणमान्य व मातब्बर मंडळी भारतीय जनता पार्टीत दाखल होण्याची जी सुरुवात झाली होती ती आजतागायत सुरू होती आणि आहेच त्यामुळे साहजिकच आपसूक त्यांचे समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे,

एकीकडे अशी स्थिती दिसत असताना मात्र काॅंग्रेसच्या गोटातील अंतर्गत दुफळी काही नेत्यांच्या संदिग्ध वागण्याबोलण्यामुळे संभ्रम निर्माण करीत आहे ,असे करताकरता बऱ्याच काळापासून दुखावलेली मंडळी फक्त पक्ष सोडून बाहेर पडत आहेत असे नाही तर पक्षांतर करुन गेल्यानंतर कांग्रेस,आणि आघाडीतील औपचारिकता व मनमानी यांविषयी जाहीर मतप्रदर्शन करतात आहे , 

काही मंडळी गटातटाच्या या संभ्रमात अजूनही आशेचा किरण शोधत आहेत , त्यासाठीआपला रितसर प्रवेशाचा दिखावाही करुन घेतला जात आहे , जातीपातीच्या राजकारणाचे खूले प्रदर्शन केले जात आहे. 

कर्तृत्ववान मंडळी विवादाचे टोक गाठल्याचे जगजाहीर झाल्यानंतरही समझोत्याचे गाजर दाखवित *मी तुमच्यासोबत येणार* हे वाक्य केवळ बोलून दाखवत नाहीत तर ते प्रत्यक्ष अंमलात आणल्याचे दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत ,मात्र या कृतीवर विश्वास नसणारे अजूनही आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत, पर्यायाने कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत.


जनतेच्या मनात एक सहानुभूती निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्याचा आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. बेरोजगारी , महागाई ,उद्योगांची कमतरता यावर भर दिला जातो आहे ,आणि जनताही भरभरून उपलब्ध संधीचा फायदा घेऊनही आम्हाला काय मिळालं ?हा प्रश्न रेटून धरत जणुकाही मिळालंच नाही अशी भूमिका घेत आगीत तेल ओतत ताकावरचं लोणी तुपासकट खाण्याची इच्छा  प्रदर्शित करीत आहे आणि आज ते केवळ *मला काय मिळालं* याचाच विचार करीत असल्यामुळे कदाचित  इच्छा असूनही मत मात्र त्यांच्या  चाहत्यांच्या विरोधात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही .

या समरांगणातूनच पुढील युद्धाच्या तयारीला लागलेली काही मंडळी इथे फक्त चमकोगिरी करीत आपली पायाभरणी करण्यासाठी तत्पर दिसत आहेत , त्यादृष्टीने ते कार्यकर्ते व काही महत्त्वाच्या व्यक्ती हेरत आहेत ,केवळ आणि केवळ त्यासाठीच त्यांची ही दिखाऊ दिलजमाई आणि वक्तव्ये आणि सामाजिक दायित्व  यांची चुणूक दाखवित आहेत.

या निवडणुकीत आपली ताकद वाढविण्यासाठी भाजप आणि काँग्रेस सोबतच राकाॅं १ व २, उबाठा शिवसेना,व शिवसेना शिंदेगट , वंचित सह इतरही पक्ष, पक्षातील मंडळी प्रयत्न करताहेत.

शेवटी काय?या लोकसभा निवडणूक प्रचारात भविष्यातील विधानसभा,जिप ,पंस, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकांचे गुपीत ही शोधण्याचा सगळ्यांचाच प्रयत्न सुरू आहे.

लवकरच बघायला मिळणार नवनवीन घडामोडी, त्यासाठी नजर आहे आमची , सहकार्याची कामना तुमची , भेटूया पुढील भागात......!


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.