निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....९. ही तर हुकूमशाहीच ! प्रचार वाहन परत पाठविणे...हा तर आदर्श आचारसंहितेचा भंगच!

 निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....९.

ही तर हुकूमशाहीच ! प्रचार वाहन परत पाठविणे...हा तर आदर्श आचारसंहितेचा भंगच!


दीपक देशपांडे.

विगत काही दिवसांत अमूक पक्षाचा प्रचाररथ परत पाठविला ,अमूक उमेदवाराला परत पाठविले ,अमूक...पक्षाला प्रचारच करु दिला नाही या आशयाच्या बातम्या वाचायला, ऐकायला मिळत होत्या  आज मात्र एक व्हिडिओ क्लिप प्रत्यक्ष बघायला मिळाली.

ही क्लिप बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली की ही प्रचाराची गाडी परतवून लावणारी व्यक्ती , सर्वसामान्य आहे आणि गाडी चालवणाऱ्या चालकाला निश्चित अशा सुचना आहेत ,की कुणी गाडी अडवली वा परत पाठवली तर त्यांच्यासोबत कुठलाही वाद न करता गाडी परत घेऊन जायची ,हे मात्र या प्रकरणी उघडपणे लक्षात येते,कारण तो एक अवाक्षरही न बोलता गाडी फिरवून आल्या पाऊली परत निघून गेला.

कल्पना करा,त्याने हुज्जत घातली असती तर? गावातील वा आजूबाजूच्या गावातील चारदोन कार्यकर्ते गोळा करुन आणले असते तर....? वादाने वाद वाढला असता तर?

https://youtu.be/7R-6kbeRrnU?si=L8KtiqOnG9eB8G63

नागरिकांना, मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा हक्क आहे मात्र अशा पद्धतीने कुणा उमेदवाराला वा त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या कोणत्याही वाहनाला वा व्यक्तीला परतवून लावण्याचा हक्क आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत नाही काय?

एरवी छोट्या छोट्या कारणांसाठी आचारसंहितेचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध बडगा उभारणारे निवडणूक यंत्रणा या व्यक्तीविरुद्ध काय कारवाई करणार?हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून असा प्रकार बंद न झाल्यास लोकांची , क्वचित प्रसंगी उमेदवारांची हिंमत वाढत जाऊन प्रतिस्पर्धी  उमेदवारांवर चढाओढीच्या  ओघात पुन्हापुन्हा असा प्रकार घडवून आणला जाऊ शकणार नाही काय?

निवडणूक म्हंटले की वेगवेगळे उमेदवार आपल्या पक्षाची ,विचारांची पाठराखण करणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रचार तर करणारच , परंतू कुठल्याशा कारणाने ,त्यांचे प्रचाररथ अशा पद्धतीने परतवून लावण्याचा हा प्रकार कुठल्याही व्यक्तीने स्वतः किंवा कुणाच्या सांगण्यावरून करणे हा अक्षम्य गुन्हा ठरु शकणार नाही काय? अशाने समाजमन कलुषीत होणार नाही काय?  सामाजिक शांतता भंग करण्याचा तो प्रयत्न नाही काय?

१३चंद्रपूर निवडणूक निर्णय अधिकारी,या प्रकरणी काय निर्णय घेतात याकडे , सर्वसामान्य नागरिक,सगळ्याचं राजकीय पक्षांचे आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, आणि विविध समाजमाध्यमांतील व्यक्तींचे लक्ष लागले आहे. शेवटी आदर्श आचारसंहिता तयारच त्यासाठी केल्या गेली आहे ना?


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.