निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....६.
निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....६.
माजी नगरपरिषदअध्यक्ष १ × माजी नगराध्यक्ष २+२ तरीही...?
दीपक देशपांडे
२०२४च्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष अनिल खानोरकर हे कांग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे बाजूने तर...
भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी मूलच्या माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर आणि बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष हरिष शर्मा , पोंभुर्णा च्या सुलभा पिपरे आणि चंद्रपूर च्या माजी महापौर राखी कंचर्लावार भरभक्कम तटबंदी करुन उभ्या आहेत.
एवढी मजबूत बांधणी असूनही आजवर न दिसणारी परंतू आज प्रत्यक्ष दिसतअसणारी,जनतेच्या दारात आलेली विकासकामे ,ती राबविणारी यंत्रणाआणि त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडलेल्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, यामुळे विरोधकांना आरोप करण्यासाठी कारणीभूत ठरतोय आणि कधी आपणच केलेल्या साध्या साध्या चुकांसाठी आपल्यालाच कारणीभूत ठरवले जात असल्याचा अनुभव भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना येत आहे. तर ... आपल्या खासदारांनी त्यांच्या हयातीत न केलेल्या एकाही कामाची मांडणी न करताच केवळ विरोधकांनी केलेल्या विकासकामांतील त्रूटी व कमी यांवर बोट ठेवून त्यावर आरोप करण्याचे धाडस विरोधातील कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर व समर्थक बिनबोभाटपणे करुन मोकळे होताहेत ,म्हणूनच कुण्या गावात आलेला प्रचाररथ परत पाठवण्याचे धाडस कोणता सरपंच करुन जातो आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही.
कधीतरी दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकून आपल्याच चुकांची भरपाई तर परस्पर विरोधकांना करावी लागते आहे, एवढेच नाही तर एखादी योजना राबविताना केलेली एक एक साधी चुकही आज त्या चुकीचा हिशेब मागत आ वासून पुढे ठाकली आहे ,आणि जनमत अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहे.
दूसऱ्यांवर विश्वास ठेवून घेतल्या गेलेल्या एकेका चुकीच्या निर्णयामुळे आता आपणच गोत्यात आल्याचा अनुभव प्रमुख उमेदवार घेत आहेत आणि म्हणूनच त्यांना आपल्याच लोकांशीसहकार्य मिळवण्यासाठी तह करुन माफी मागावी लागत आहे, त्याशिवाय का कुणी अजूनही प्रचार करण्यासाठी पुढे धजावतांना दिसत नाहीत आणि प्रत्येक पाऊल जपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
ही वास्तविकता नजरेआड करता येणार नाही ,कारण रणसंग्राम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचतो आहे.
समजायला वेळ लागेल पण समजेल तेंव्हा वेळ निघून गेली असेल , एवढं मात्र निश्चित.
.......आणखी बरंच काही आहेच,पण....धीर धरा.... पुढील भागात......
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment