जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

*जनतेकडून प्राप्त तक्रारींवर सात दिवसांत उत्तर मागवण्याचे आदेश*

शासकीय अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक नियमावली

दीपक देशपांडे.

सामान्य नागरिकांकडून अधिकाऱ्यांना ई-मेलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा आशय लक्षात घेऊन संबंधित कार्यालयाकडून ७ दिवसांत उत्तर/अहवाल मागवण्यात यावा, असे आदेश देणारा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यातील ही महत्त्वाची सूचना आहे.

सामान्य नागरिकांना राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये वैयक्तिकपणे जाऊन तक्रार, निवेदन किंवा गाऱ्हाणी मांडणे प्रत्येकदा शक्य होत नसल्याने शासनाने विविध संकेतस्थळ विकसित करून त्यावर ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी आणि निवेदने स्वीकारण्याची सुविधा दिली. मात्र, जनतेकडून येणाऱ्या तक्रारी आणि निवेदनांची संख्या मोठी असून अनेक दिवस त्या निकालीच काढल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाचे दैनंदिन कामकाज पारदर्शक आणि अधिक लोकाभिमुख होण्यासाठी विविध संकेतस्थळ विकसित केले आहेत. नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारे 'आपले सरकार' हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. ऑनलाईन पद्धतीने तक्रार आणि ऑनलाईन पद्धतीने तक्रारीचे निवारण करावे यासाठी ही प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यामंध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. नागरिकांनी केलेल्या अनेक तक्रारींचा निपटारा त्वरित करणे शक्य होत नाही. दिवसेंदिवस या ई मेलची संख्या वाढत असून ती कमी करण्यासाठी ही उपायात्मक योजना करण्यात आली आहे.

मार्गदर्शक सूचना

■ उपरोक्त उत्तराचे स्वरूप सर्व शासकीय ईमेल्सकरिता 'स्वयं उत्तर' म्हणून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माहिती तंत्रज्ञान संचालनालयाची राहील. कोणतेही ई-मेल विनाउत्तरित राहणार नाहीत याची सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

■ जर एकाच स्वरूपाचे, विषयाचे ई-मेल वारंवार येत असतील आणि त्यावर पूर्वीच कार्यवाही होऊन संबंधितांस कळवण्यात आले असल्याची खातरजमा करून ते रद्द करावे.

■ उपरोक्त नमूद ईमेलबाबत जर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास ईमेलकर्त्याची ओळख पटवून आणि विषयाचा आशय लक्षात घेऊन संबंधित कार्यालयाकडून ७ दिवसांत उत्तर, अहवाल मागवण्यात यावा.

■ एखादा ईमेल विभागाच्या प्रभारी मंत्र्यांपासून त्याखालील अधिकाऱ्यांपर्यंत पाठवण्यात आला असेल तर एकाच ई-मेलवर कार्यवाही करावी.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.