निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१२. भर पावसातील सभा!!!
निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१२.
भर पावसातील सभा!!!
दीपक देशपांडे
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चंद्रपूर-वणी-आर्णी -लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या गृहमतदार-- संघातील वरोरा येथे प्रचारसभेत बोलताना आदल्या दिवशीच्या कार्यक्रमातील भाषणाची अर्धवट काटछाट करून सुरू असलेल्या अपप्रचाराला तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले.
याप्रसंगी त्यांनी वरोरा येथे बोलायला सुरुवात केली आणि मेघधारा बरसू लागल्या तेंव्हा हातात माईक घेऊन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला गुढीपाडव्याच्या, व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि.....आपण या क्षेत्राचे आमदार नसूनद्दी वरोरा येथे केलेली कामे आणि बल्लारपूर मतदार संघातील कामे कथन केली. "ये तो सिर्फ ट्रेलर है अगर मैं लोकसभा जाता हुं तो शोले से ज्यादा हिट फिल्म दिये बिना नहीं रहूंगा, असे आश्वासन देत उपस्थितांची मने जिंकली . या प्रचार सभेत बोलतांना ते म्हणाले की, ही "देशी" ची नाही ही "देशा" ची लढाई आहे. त्यामुळे विकासाची कामे शो करुन सत्य बोलून मते मागायला हवी, असे आवाहन करतानाच दोन वर्ष आठ महिने सत्तेत असणाऱ्यांनी विकासावर न बोलता मोठी रक्कम देऊन आणलेल्या सोशल मीडियाचा वापर करुन जनतेची दिशाभूल करीत असाल तर..... मतदार घरचा रस्ता दाखवतील ,असा सज्जड इशाराही दिला.
महाराष्ट्रातील सगळ्यात उत्तम तिन सिंथेटिक टॅंक चंद्रपूर जिल्ह्यात आहे,रस्त्याचे जाळे , सिंचन सुविधा ज्या आपण आणलेल्या आहेत. सिंचन प्रकल्प, मामा तलावासाठी १४० कोटी रुपये दिले, असे अनेक विकासाचे कार्य आपण केली आहेत. एका दारु दुकानाचे सतरा दूकाने करणे म्हणजे विकास नव्हे. देशाच्या विकासासाठी मत द्या, निर्णय तुमचा आहे. गुंडाराज, माफियाराज संपवायचा आहे असे आवाहन यावेळी उपस्थितांना भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वरोरा येथील ग्रामीण व शहरी भागातील आनंदवन, साळोटी, मेसा, शेगांव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारव्हा, वडगांव, नागरी, गौळ, मुदगांव, वाघनख, केळी, माढेळी सह अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या व विकास कामे सांगून मतांचा आशीर्वाद मागितला.
नुकतेचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूटात सभा झाली या सभेतल्या सूधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाची आपल्या सोयीनुसार व्हिडिओ कापून काँग्रेसच्या होत असलेल्या अपप्रचाराची सर्वत्र निंदा होत आहे. अशा परिस्थितीत वरोरा येथील सभेमध्ये मतदारांना संबोधित करीत मुनगंटीवार यांनी गुंडाराज व माफिया राज संपवून विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आणि या आवाहनाला भर पावसातही उपस्थित जनसमुदायाने भरभरून प्रतिसाद दिल्याने काॅंग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अशाच वेगवेगळ्या विषयांवर साधकबाधक चर्चा आणि प्रभावी व्यक्तींची प्रभावी भुमिका घेऊन आम्ही आपल्या भेटीला पून्हा येणारच आहोत..... पुढील भागात...
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment