निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१६. बदलत्या रंगछटांचा उन्हाळी पावसाळा !
निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१६.
बदलत्या रंगछटांचा उन्हाळी पावसाळा !
दीपक देशपांडे
एकीकडे निवडणुकांची धामधूम सुरू असून निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय मंडळी वेगवेगळ्या वक्तव्यातून वेगळेच रंग उधळताना दिसताहेत तर प्रचारादरम्यान काही नेतेमंडळी आपल्या रागाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत तर काहींची जिभ घसरत एक वेगळेच वळण देण्याचा अनाहूत प्रयत्न होतो आहे , यांचा फायदा की गैरफायदा विरोधक मात्र पद्धतशीरपणे घेतांना दिसताहेत ,जनतेची मात्र करमणूक होत आहे,नव्हे चंगळच सुरू आहे. कुणी आश्वासनांची खैरात वाटत सुटले आहे तर कुणी शासकीय तिजोरीतून पै न पै जनतेला वाटत सुटले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या झाल्या आहेत हे माहित असतांनाही ,कारण काय तर सत्ता प्राप्ती हा एकमेव उद्देश. कुणी काम करून त्यांच्या मोबदल्यात काही मागत आहे तर कुणी आपली कोठारे भरण्यासाठी हा सर्व आटापिटा करीत आहेत , जनतेला हे सगळं दिसत आहे पण यांत आपला स्वार्थ आणि फायदा दिसत असताना कोण कुणाचा विरोध करणार ? नाही काय.
दूसरीकडे निसर्गाचा पारा थोडा वाढतो न वाढतो तोच वातावरण बदलून कधी वारा वादळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी मेघगर्जनेसह गारपीट होऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न होतो आहे.
हवामान खात्याचे अनुमानानुसार असाच एकआठवड्याचा उन्हाळी पावसाळा या सप्ताहात जनतेला अनुभवायला मिळतोय.आर्थिक सामाजिक , राजकीय वातावरण तापले आहे पण त्यात शितल थंड पाण्याचा हळूवार शिडकावा मनाला शांती प्रदान करीत आहे. हा अनुभव दुबार धानपिक घेणाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे,तर फळ, फळभाज्या आणि कडधान्ये पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरणार आहे, नुकसानभरपाईचे जाहीर झालेले शासकीयअनुदान मिळविण्यासाठी आँनलाईन केंद्रावर येरझारा घालणाऱ्या शेतकऱ्यांना बंद साईटमुळे मानसिक त्रास होत आहे तर निवडणुकीचे कारण दाखवित महसूल,पोलिस आणि,पं.समिती नगरप्रशासन आवश्यक बाबींची पूर्तता करण्यातही कुचराई करताना दिसत आहे, शासनाच्या मोफतच्यायोजनांच्या लाभासाठी शेकडो हजारो लाभार्थी आवेदने करीत आहेत,रोजच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत तरीही ओरड होतच आहे.
फक्त नोंदणी करुन ठेवल्याने धान्याचा एक दाणा ही न देता हेक्टरी २०,०००/₹शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत तर खरे नुकसान होऊनही पीकविमा देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे परिणामी *चोरांची साथ व इमानदारांचा घात* अशी दुषणे सत्ताधाऱ्यांचा दिली जात आहेत.
कुणी कितीही विकासकामे केली नाहीत म्हटल्याने केलेली विकासकामे लपवता येणार नाहीत की कामे करुनही विरोधकांचे नावबोट ठेवणं काही कमी होणार नाही आणि मोफतचं कितीही वाटून मतदारांचीपूर्ण मते मिळवता येणार नाही हे अंतिम सत्य आहे, हे विसरून चालणार नाही, कारण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत हे काही कुणालाच पटणारे नाहीच.
अशा या रंगबिरंगी छटा या आठवड्यात त्यात पून्हा नवरंगाची उधळण करीत मुक्तपणे उधळलेल्या आपल्याला बघायला मिळणारच आहेत , तेंव्हा आपण हवेच्या झोक्यावर हलकेच हिंदोळे घेऊन तरंगण्याचा प्रयत्न करुयात.
निवडणूक ज्वर जरा कमी करण्याचा हा प्रयत्न , पटलं तर ठिक नाहीच पटलं तरी ठिकच.... कारण आपण पुन्हा भेटणार आहोतच की पुढील भागात.....
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment