निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....५.

 निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....५.

आले-गेले--×--झाले-गेले.

दीपक देशपांडे.


२०२४ची लोकसभा निवडणूक १३चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या दिवसांपासून एका नव्याच कारणाने गाजत आहे.


कुठे पक्षावरची निष्ठा संपवून कुणी आपला पक्ष सोडून विरोधी पक्षात प्रवेश घेतोय तर कुठे आपल्याच पक्षात प्रवेश घेतल्याचा दिखावा केला जातोय, कुठे झालेगेले विसरुन एकदिलाने काम करण्याची गरज प्रतिपादीत केली जाते तर कुठे  आपला विरोध होणारच नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

कुठे सहकार्याची अपेक्षा आहे तर कुठे आपलेच आपला घातपात घडवून आणतील अशी शक्यता आहे.


कोणाकडे प्रचारयंत्रणा सांभाळणारी एक लांबचलांब फळी आहे,तर कोणाकडे एकला चलो रे ची भुमिका घेऊन एकटा-एकट्यानेच प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

शेवटी कसं आहे ना? ज्याला तिकीट पाहिजे होते त्यांना ते मिळू दिले नाही आणि ज्यांना या लढाईत उतरायचेच नव्हते(म्हणजे तसा दिखावा केला गेला)ते कंबर कसून समरांगणातउतरले आहेत, कुणी आघाडीवर तर कुणी पडद्याआडून जिवाचे रान करताहेत.

निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसा ,प्रचाराचा विषय बदलत चालला आहे , आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत, विकास कशाला म्हणतात  हे माहित नसणारे विकासाच्या गोष्टी करताहेत आणि वर्षानुवर्षे सत्तेत असणारे विकासाची  परिभाषा  विचारतात आहे. 

कुणाकडे केलेल्या कामाची लांबचलांब यादी आहे तर कुणाकडे आरोप आणि आक्षेपार्ह वचनांची यादी आहे.नाही म्हणायला काल कालपर्यंत कुणी केलेल्या कामाची धज्जी उडवणारे आज खांद्याला खांदा लावून एकदिलाने काम करताहेत तर कुणी पोकळ आरोपांच्या फैरी झाडत दूषणे देत जाबजबाब  विचारत फिरत आहेत.

राहता राहिला प्रश्न तर शेवटचा उपाय म्हणून असहाय्यतेच्या विरोधातली लढाई , हुकूमशाही विरुद्ध.........× घराणेशाहीच्या विरोधातली लढाई...... अशा बिरुदांची मुक्तहस्ते उधळण होत आहे.

सरता शेवटी विषयआला *जातीचा*

पण खरं सांगू का? जात नाही ती जात म्हणून जातियवादी  राजकारण! .........जे संपविण्यात कुणालाच स्वारस्य नाही ती जात,यांचा आधार घेऊन आरोप केला की सगळंच कसं सोपं होऊन जातं असा समज म्हणजे जातीयवादी राजकारण! हे कुणाला संपवायचेच नाही हे विसरु नका ,कारण ज्यादिवशी हा *जात आणि सोबतीला आरक्षण*  हे विषय संपतील त्यादिवशी निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न आपसूकच सुटतील आणि तो राजकीय समरांगणातील एक महत्त्वाचा मुद्दा राहणारच नाही तर मग वाद,भांडणे , मारामारी संपून गेली तर....?

राजकारणाचा विषय काय राहिलं,मुद्दे आणि प्रगती व समाजहीत? यांवर भाष्य करायला फुकाचा वेळ कुणाजवळ आहे?

सगळंच आजच सांगून टाकलं तर ... पुढील भागात नक्की भेटू...असाच एक नवीन विषय घेऊन.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.