निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....४.

 निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....४.


सोशल मीडिया वार.

दीपक देशपांडे 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक १९एप्रिल रोजी होणार असून मुख्य लढत भाजपाचे हेवी वेट उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काॅंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात होण्याची शक्यता असून दोन्ही उमेदवार आपल्यासाठी काहीसे नवीन वाटणारे क्षेत्रात आधी प्रचाराची रणधुमाळी माजवित आहेत तर या निवडणुकीत महत्वाचा संपर्क दूवा बनलेल्या समाजमाध्यमांवर शीतयुद्ध शिगेला पोहोचू बघत आहे.

भाजपाच्या सोशल अकाउंट वरुन

वंदे मातरम्...

प्रिय, बंधू आणि भगिनींनो आपणास सप्रेम नमस्कार !

३० वर्ष आमदार,भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा ३ वर्ष यशस्वीपणे सांभाळणारे,७ वर्षात अर्थमंत्री,वनमंत्री,सांस्कृतिक कार्य मंत्री,मत्स्यव्यवसाय मंत्री पदाचा अनुभव,विरोधी पक्षात असताना विधानसभेत विविध आयुधे चा वापर करुन जनतेसाठी सरकारला सळो कि पळो करून सोडणारे आणि उच्च शिक्षित असे सर्वांना सोबत घेवून चालणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूकीत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उभे आहेत.

मित्रांनो ३० वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची,महाराष्ट्राची सेवा करताना सुधीरभाऊ कधीच जात-धर्म-पंत,गरीब-श्रीमंत, शेतमजूर-कष्टकरी ,अंध-अपंग, पक्षभेद असा भेदभाव न करता सर्वांसाठी उपलब्ध असणारा लोकनेता म्हणून कायम निस्वार्थीपणे कार्य करीत आलेले आहे.

आज पर्यंत आपण जनतेनी भाऊंना प्रेम,आशीर्वाद आणि साथ कायम देत चंद्रपूर ची तोफ मुंबईत धडकवत होते,आता वेळ आली आहे ती तोफ दिल्लीच्या संसदेत धडकवण्याची.....

म्हणून आपण सर्वांनी जात-धर्म,पक्ष न बघता समाजासाठी,गावासाठी,आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, चंद्रपूर लोकसभेचा गौरव वाढविण्यासाठी योग्य असणारे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प घेवून तो पूर्ण करूया... !! ✌️✌️✌️✌️✌️

भारतीय जनता पार्टी

चंद्रपूर-वणी-आर्णी,लोकसभा मतदारसंघ

या आशयाचा संदेश वायरल होतोय तर .....

काॅंग्रेसच्या गोटातून... आलटून पालटून.... 

*प्रतिभाताई धानोरकर यांनी फुंकले विजयाचे रनशिंख*

चंद्रपूर : -चंद्रपुरात काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी उमेदवारी दाखल करतांना विशाल शक्तिप्रदर्शन करत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची झोप उडविली आहे.शक्तिप्रदर्शनाचा परिणाम चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जनमानसात इतका प्रभाव पडला आहे की चहुबाजूंनी प्रतिभाताई धानोरकर यांची लाट असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात आणि मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या एकंदर विरोधाला प्रतिभाताई धानोरकर यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया येत आहेत.

महाराष्ट्र टाईम ने घेतलेल्या सर्व्हे नुसार प्रतिभाताई धानोरकर यांना ८५% तर सुधीर मुनगंटीवार यांना फक्त १५ % लोकांनी पसंती दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी लावलेली ३३ कोटी झाडे कुठे सावली देत आहेत हा जनतेचा प्रश्न आहे !!?? शेतकरी आत्महत्या करीत करीत असतांना जनतेचा पैसा उत्सवावर साजरा करून विकास ही बिरुदावली लावणे योग्य आहे काय !!?? असे जनतेला वाटते.आपल्याच चाहत्यांना ठेके देऊन कामाचा दर्जा दुय्यम प्रतीचा करण्याकडे सुधीर मुनगंटीवार यांचा अधिक कल असतो असे जनतेचे म्हणणे आहे.

बाबूपेठ उडान पुलाचा प्रश्न भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतांना सुद्धा निकाली काढता आला नाही असे जनतेचे म्हणणे आहे.पर्यावरणाचा प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार सफसेल अयशस्वी झाले आहेत.

इव्हेंट साजरे करून बेरोजगारी,महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न सुटणारे नाहीत म्हणून जनता सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येते.

कालच्या महाविकास आघाडीच्या रॅलीने चंद्रपुर लोकसभेचे लक्ष वेधून तर घेतलेच मात्र भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. 

मूळ प्रश्नांना बगल देत आज "निवडणूक चंदा" घोटाळ्याने जी देशात हुकूमशाही प्रवृत्ती निर्माण केली आहे आणि संविधान धोक्यात आणून देशात असूरक्षेचे वातावरण निर्माण केले आहे याचे प्रतिबिंब शक्तिप्रदर्शनात मोठ्या प्रमाणात दिसून आले.

भाजप प्रचंड पैसा खर्च करून विरोधकांना ईडी लावून तुरुंगात पाठविण्यात व्यस्त असल्याची खमंग चर्चा होतांना दिसली.चंद्रपुर लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत कमालीचा उत्साह व  "भाजपाको दिखायेंगे प्रतिभाको लायेंगे" अश्याही  चौकाचौकात चर्चा असल्याचे दिसून आले. 

एकंदरीत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मतदार कमालीचा आक्रोशित असलेला दिसला. 

हाच उत्साह मतदानाच्या शेवटी पर्यँत टिकून राहिल्यास आणि मतदानात परावर्तित झाल्यास सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाच्या छायेतून कोणीही वाचवू शकत नाहीत.

मतदाराच्या घराघरात भाजपाचा भ्रष्ट कारभार, खोटारडेपणा,महागाई,बेरोजगारी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाने केल्यास प्रतिभाताई धानोरकर यांचा विजय निश्चित समजल्या जातो आहे.

या आशयाचा मजकूर वायरल केला जात आहे.

सुज्ञ मतदारांना ह्यातील गर्भितार्थ पटवून देण्याची आवश्यकता आहे??? असे मला तरी वाटत नाही आणि दोन्ही संदेश प्रकाशित होऊन  वायरल झाल्याने  मतदारांना  प्रत्येकाची भुमिका समजू लागली आहे,असे समजायचे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.