.निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१५. *अतिशय शांत आणि संयमी प्रचारतंत्र उत्सुकतेचा परिपाठ!*

 निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१५.

*अतिशय शांत आणि संयमी प्रचारतंत्र उत्सुकतेचा परिपाठ!*

दीपक देशपांडे 

१८व्या लोकसभेसाठी १३चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात चंद्रपूर येथून केली आहे ,त्यानंतर  दररोज नवनवीन विषयांसह तक्रारी ,आरोप-प्रत्यारोप  यांमुळे चंद्रपूर चे नाव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आहे.

त्याचीच दूसरी बाजू सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात मात्र ना भाजपा ना काॅंग्रेसच्या गोटातून म्हणावा तसा झंझावात आहे ना प्रचाराची रणधुमाळी सारे कसे शांत-शांत त्यामुळे जनतेला प्रश्न पडला असून संभ्रम निर्माण झाला आहे. आता मात्र हळूहळू तापमान वाढू लागले आहे , आणि कांग्रेस सह भाजपनेही ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आहे.

दररोज नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहे,कुठे जातीयवादाचे बीज पेरल्या जात आहे तर कुठे विकासकामांची चर्चा रंगवली जात आहे ,कुठे विकासकामांची लांबलचक यादी सांगितली जाते आहे तर कुठे भविष्यात करावयाच्या उपाययोजना मात्र ही लढाई सर्वसामान्य जनता , शेतकरी , शेतमजूर, छोटेमोठे व्यापारी , उद्योजक यांचेसाठी नेमकं काय करायचं आहे,काय करणार आहोत ही स्पष्ट भुमिका कुणीही स्पष्ट करायला तयार नाही .

केवळ स्वप्नवत वाटणारी आश्वासने ,आणि मोफतच्या लयलुटीची पोकळ आश्वासने ही या निवडणुकीची मुख्य आकर्षण केंद्र होऊ बघत आहेत.

सभा , जाहीर सभा, वैचारिक देवाणघेवाण यापेक्षा वैयक्तिक संपर्कावर भर देण्याचा प्रयत्न केला जातो आहे ,तोही गटागटाने, प्रचारात जाण फुंकण्यासाठी आता शेवटच्या  टप्प्यात कांग्रेसच्या वतीने गांधी कुटुंबातील प्रियंका वढेरा यांची सभा होऊ घातली आहे. 

गटातटाच्या राजकारणामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यात मोठी दरी निर्माण झाली असून दोन्ही पक्षांतील ही गटबाजी आपल्याच उमेदवारांना मारक ठरणार आहे. त्याचवेळी उबाठा शिवसेना गटात युवकांच्या दररोज शेकडोंच्या संख्येने प्रवेशाच्या  खऱ्याखोट्या... बातम्या मात्र  प्रत्येकाला विचार करायला लावत असून ही मंडळी आपला कल कोणाकडे देतील याबाबत निश्चितच सगळेच साशंक आहेत.

काॅंग्रेसच्या गोटातील गटबाजीचा फटका असा आहे की काॅंग्रेसभवन मध्ये जाणारा कार्यकर्ता एका गटाचा आणि प्रचारयंत्रणा सांभाळणारी दूसऱ्या गटातील मंडळी  शहराच्या पूर्वेला असलेल्या बंगल्यात भेट देऊनच प्रचाराची रणनीती आखत आहेत ,तर रात्री उशीरा पर्यंत मूल शहरात दाखल होणारी मंडळी बसस्थानकासमोर आपली क्षुधा शांती करुन दूसऱ्या दिवसांची कार्याची आखणी करताना दिसतात तर भाजपाच्या कार्यालयात जमणारी मंडळी आणि ग्रामीण भागात प्रत्यक्ष कार्यरत मंडळी आपापली रणनीती वेगवेगळ्या पद्धतीने राबवीत आहेत. मात्र न दिसणारी इतर उमेदवारांची उपस्थिती कोणत्या मतांना सुरुंग लावणार हे तर मतदान झाल्याशिवाय स्पष्ट होईल असे आज तरी वाटत नाही.

कुठे गावाच्या कानाकोपऱ्यात लागलेली पोस्टर , बॅनर  आणि सकाळपासून सायंकाळपर्यंत वाजत फिरणाऱ्या एका प्रचाररथाविरोधात एकही पोस्टर बॅनर नजरेत न पडण्याची चर्चा गावागावात रंगू लागली असून एक‌‌‌ एकट्याने राबवलेली प्रचाराची धूरा विरुद्ध कार्नरसभा आणि बूथनिहाय संपर्क यंत्रणा कशी रंगत आणते हाही एक चर्चेचा विषय ठरला तर नवल नसावे.

या दुफळीचा फायदा कोण कसा आणि कुणासाठी करुन घेणार ? जनतेच्या मनात काय? जनतेच्या निशाण्यावर कोण, अंतर्गत कलह कोण सावरणार? दृष्य अदृश्य प्रचार जनतेच्या मनातील संभ्रम कोण दूर करणार?अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे  देण्यास मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत होणारे मतदान, त्यापूर्वी होणारी दिलजमाई ,ताणले जाणारे संबंध आणि जनमनावर प्रभाव पाडणारी वक्तव्ये या बाबी कारणीभूत ठरतील अशी आशा आहे.

आपण ह्यावर लक्ष ठेवून असणार आहोतच, पून्हा भेट होईलच नवीन विषय नविन घडामोडींसह......


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.