*बिग ब्रेकिंग* चितळाला जीवदान, संजीवन संस्थेचे पदाधिकारी मदतीला धावले.

 *बिग ब्रेकिंग*

चितळाला जीवदान, संजीवन संस्थेचे पदाधिकारी मदतीला धावले.

दीपक देशपांडे




मूलपासून अवघ्या पाच-सहा किमी.अंतरावर असलेल्या  डोनी फाट्या जवळ एका चितळाच्या पिल्याला जो अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता. मूल येथील गोल्डी भोयर यांनी त्याला  संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, अंकुश वाणी, स्वप्नील आक्केवार ,यांच्या स्वाधीन केले.  ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली ,या घटनेची माहिती मूलचे प्रभारी क्षेत्र सहाय्यक राकेश गुरनुले, वनरक्षक सूधीर ठाकुर, अस्थाई वनमजूर विशाल टेकाम यांना देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौंनकर यांनी त्वरित येऊन जखमी चितळाच्या पील्यावर प्राथमिक उपचार केले व जानाळा येथे पींज-यात ठेवले...उद्या सकाळी पुन्हा एकदा डॉ संदिप छौंनकर वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांसोबत जाऊन चितळाची तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे मॅडम यांच्या सुचनेनुसार पुढील उपचारासाठी चितळाला चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्र येथे नेण्यात येईल.... असे कळते.

 वेळीच मदतीला धावून जाणाऱ्या प्राणीमित्र आणि संजीवन पर्यावरण संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचे कौतुक करण्यात येत आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.