नवोदय विद्यालयाच्प्रया प्रवेश पूर्व परीक्षा निकाल जाहीर.

नवोदय विद्यालयाच्प्रया प्रवेश पूर्व परीक्षा निकाल जाहीर.

 मूल ,चंद्रपूर :- दीपक देशपांडे 

जवाहर नवोदय विद्यालय साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील ८० विद्यार्थी पात्र ठरले.


केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली होती. जिह्यातील एकमेव तळोधी (बाळापूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी ही परीक्षा होती.
यासाठी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले, परीक्षेच्या निकालानंतर ८० विद्यार्थी पात्र ठरले , या प्रवेशासाठी प्रचंड चुरस असते. परीक्षेतून भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अश्या तीन स्तरावर विद्याथ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते.
यात चंद्रपूर तालुक्यातील ०२, भद्रावती ०२, वरोरा १०, चिमूर ०४, नागभीड ०५, ब्रह्मपुरी ०९, सिंदेवाही १४, मूल ०२, सावली ०४, गोंडपीपरी १०, राजुरा ०३, कोरपना ०५, बल्लारपूर ०३, पोंभुर्णा ०३ आणि जिवती येथून ०४ विद्यार्थ्यांची निवड झाली. मागील वर्षी सिंदेवाही तालुक्यातील २७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती ती घटून आता १४ वर आली तरीही हा तालुका अव्वल ठरला, विशेष बाब म्हणजे गोंडपीपरी तालुक्याने मुसंडी मारली असून मागच्या वर्षी ०३ विद्यार्थी पात्र ठरलेला हा तालुका या वर्षी १० विद्यार्थी पात्र ठरवून कौतुकास पात्र ठरला.
चंद्रपूर, भद्रावती, मुल, या तालुक्यातून प्रत्येकी २ व राजुरा, बल्लारपूर, पोंभुर्णा येथील ०३ विद्यार्थी पात्र ठरल्यामुळे या तालुक्यावर विशेष मेहनत करण्याची गरज आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.