शासकिय पथक आपल्या दारी !

 सावधान! निवडणूक संदर्भात वयोवृद्ध  व्यक्ती  व दिव्यांग व्यक्तींची  शहानिशा करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात शासकीय अधिकारी रवाना.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आटोकाट प्रयत्न!


मूल, दीपक देशपांडे

१३, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून शासनाने मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेत मतदारसंघातील वयोवृद्ध व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींची शहानिशा करून मतदानाच्या दिवशी मतदान पत्र त्यांचे पर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे .

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ७२- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामधील मुल, बल्लारपूर, पोंभुर्णा, चंद्रपूर तालुक्यातील ८५ + (AVSC) आणि दिव्यांग (AVPD) मतदारांना गृहमतदानाव्दारे मतदान करण्याकरीता मोबाईल मतदान पथक दिनांक ०८/०४/२०२४ ते ११/०४/२०२४ या कालावधीमध्ये सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार नेमून दिलेल्या दिनांकास व वेळेत पात्र मतदारांचे घरी जावून मतदानाची प्रकीया सुरळीतपणे करणार आहे.

त्यानुषंगाने, सोबत जोडलेल्या विवरणपत्रानूसार ८५ + (AVSC) आणि दिव्यांग (AVPD) मतदार यांचे घरी जावून मतदारांना गृह मतदानाबाबची माहिती द्यावी. विवरणपत्रात नमुद दिनांकास व वेळेस घरी उपस्थित राहण्यास सुचीत करावे. तसेच आपणही उक्त दिनांकास व वेळेत विवरणपत्रानुसार न चुकता उपस्थित रहावे. सदर कामात हयगय व निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास आपणाविरुदध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.अशा आशयाचे पत्र मिळाले असून त्यानुषंगाने    ...........त्याचा आढावा घेण्यासाठी  व प्रत्यक्ष  अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन हे पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.


निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आज दिनांक ८एप्रिल रोजी मूलच्या प्रशासकीय भवनातून मूलचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांचे प्रमुख उपस्थितीत ह्या पथकांना रवाना करण्यात आले, यावेळी मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.