निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....३.
निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....३.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश मारकवार विरुद्ध संध्या गुरनूले???
दीपक देशपांडे
२०२४ ची लोकसभा निवडणुक चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चंद्रपूर वणीआर्णी मतदारसंघात चंद्रपूर च्या दोन माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खांद्यावर प्रचाराचा भार सोपवून लढली जात आहे???
काॅंग्रेसच्या गोटातील हा भार स्वयंप्रेरणेने उचलला आहे, प्रकाश पाटील मारकवार यांनी, काॅंग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा होताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या प्रकाश पाटलांनी मूल तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेच्या गृहभेटी घेणे सुरु केले , एकला चलो रे म्हणत त्यांनी मतदारांच्या दारात हजेरी लावली ,मतदारांसमोर फोटोसेशन केले ,त्यांना पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आणि स्वतःच्या अकाउंट वरुन त्या आशयाचे वृत्त समाजमाध्यमांवर वायरल ही केले ,ही झाली एका माजी जिप अध्यक्षांची कार्यप्रणाली तर दुसरीकडे संध्या गुरनूले पक्षादेश मानत आपले जिल्हा परिषद क्षेत्र सोडून दूर यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी आर्णी परिसरात आपल्या इतर सहकाऱ्यांसह तळ ठोकून बसल्या आहेत ,या भागातील वेगवेगळ्या समाजातील मतदारांना आपल्या भागात भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या कामाची यादी आणि कार्यपद्धती पटवून देण्यासाठी, गृहभेटी, समाजजागृती ,कोपरा सभा, सामाजिक मेळाव्यात संबोधन करीत आहेत.
भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार वणीआर्णी परिसर पिंजून काढत आहेत ,वणी परिसरातील जून्या दिवसांची आठवण ताजी करीत आपला या भागाशी असलेला ऋणानुबंध उजागर करीत या ना त्या कारणाने आपल्या कार्यकुशलतेचा आणि केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत आहेत , सोमवार ते रविवार जनतेच्या सेवेसाठी तत्पर असण्याची ग्वाही देताहेत , सोबतीला कार्यकर्त्यांची फौज आहे तर... काॅंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर मूल पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला बाळू धानोरकर यांचे अपूर्व राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आणि या क्षेत्रातील इतिहासातील दूसरी महिला खासदार म्हणून संसदेच्या सर्वोच्च सभागृहात पाठविण्याची विनंती करीत *झाले गेले गंगेला मिळाले हे सारे विसरून नव्या दमाने एकमेकांना सहकार्य करीत हा लढा लढू* असा आशावाद घेऊन निवडून देण्याचे आवाहन करीत जिवाचे रान करीत फिरताहेत , आणि कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची विनंती करताहेत, मात्र अंतरंगात कुठेतरी आपल्याच लोकांवर विश्वास ठेवायचा का?या प्रश्नांची शंका निश्चितच स्वस्थ बसू देत नाहीये.हे मात्र कटू सत्य आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार हे निवडणुका समोर दिसू लागताच जनतेच्या दरबारात हजेरी लावतात हा जनतेचा अनुभव असून इतर वेळात ते नेमकं कुठं असतात आणि काय करतात?हा जनतेला पडलेला प्रश्न आहे तर संध्या गुरनूले या नियमीत कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात , त्यांच्यातील एक होऊन त्यांच्या भाषेत संवाद साधतात , महिला व पुरुषांना जवळ बोलावून तेवढ्याच आपुलकीने त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात यामुळे पक्षातील राजकारणापलिकडे जाऊन त्यांचा व्यापक संपर्क असतो अशी प्रतिक्रिया मतदारांशी संवाद साधताना पुढे आली आहे.
अशा या दोन धुरंधर सेनापतींच्या भरवशावर लढली जाणारी ही निवडणूक प्रतिष्ठेची गुढी कोण उभारणार ह्याकडे लोकसभा मतदारसंघातीलच नव्हें तर राज्य आणि देशपातळीवर लक्ष केंद्रित करणारा मतदारसंघ म्हणून उदयास आला आहे , शेवटी शेतकरी ,कामकरी , सर्वसामान्य नागरिक, प्रतिष्ठा आणि कार्यकुशलतेचे मुल्यमापन कसे करणार?यांवरच ह्या निवडणुकीचा कौल असणार आहे.
हे तर चालतच राहणार आहे ,बघूया... पुढेपुढे काय घडणार आहे...
पून्हा भेटूया......पुढील भागात.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment