चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार यांचा भाजपात प्रवेश.

 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार  यांचा भाजपात प्रवेश.

लोकसभा निवडणूक ,घरचेच देताहेत महाविकास आघाडी उमेदवाराला हादरा?

चंद्रपूर :-दीपक देशपांडे.   


चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत आता रंग भरला जात असतांना काही राजकीय नेते आपली भूमिका बदलताना दिसत आहे, त्यातच भाजपा उमेदवार व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यावर  विश्वास ठेऊन चंद्रपूर वणी आर्णी येथील अनेक राजकीय नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतांना दिसत आहे. स्वकीय असो वा विरोधक हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कामानिमित्याने आले तर त्यांचे काम ते नक्की करतात, हा अनुभव कदाचित सर्वाना आला असावा व त्यांचा स्वभाव सर्वाना परिचित झाला असून  मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून अनेक राजकीय पक्षाचे नेते पक्ष प्रवेश करत आहे, त्यात आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केल्याने भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची ताकत वाढली आहे, यापूर्वी कांग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतल्याने भद्रावती वरोरा  परिसरात राजकीय वातावरण तापले असून मनोहर पाऊणकार यांच्या भाजप प्रवेशाने  मोठे धमाके होत असून काॅंग्रेसच्या  पायाखालची जागा हलतांना दिसत आहे, यापूर्वी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात संभावित उमेदवार असलेले सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी आपल्या समर्थकासह कालच भाजप मध्ये प्रवेश केला होता, तो  धक्का  पचवण्यापूर्वीच हा दूसरा धक्काआता  काॅंग्रेस  गोटात वादळ निर्माण केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया उमटायला लागली आहे. तिकडे कितीही तडजोड झाल्याची बतावणी केली जात असली तरीही मूल पोंभुर्णा तालुक्यातील नेतृत्व किती सक्षमपणे काॅंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सहकार्य करेल हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया मतदारांशी संवाद साधताना पुढे आली आहे. 

दूसऱ्यांवर जातियवादी असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही कुणबी समाजाचे वतीने पूर्ण पाठिंबा मिळेलच याचीही शाश्वती नाही तर ओबीसी समाजही पूर्णपणे मागील निवडणुकीत खंबीरपणे उभा राहिला होता तसा यावेळी राहणार नाही तर वंचित आघाडीचे उमेदवार निश्चितच यात सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही कारण एससी, एसटी व ओबीसी यावेळी लक्ष काॅंग्रेसलाच करण्यासाठी तत्पर असतील अशी आशा वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या समाज आणि मतदारांच्या प्रतिक्रियांतून पूढे आली आहे.


     *दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*                    


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.