निवडणूक समरांगणातील लढवय्ये!..१३..*एक पत्र असेही...!......

 *निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....१३..*

*एक पत्र असेही......!*


दीपक देशपांडे.

निवडणूक समरांगणात उतरल्यावर काही चांगल्या आणि काही मनाला न पटणाऱ्या गोष्टी आपण बघतो,ऐकतो ,त्यावर टीकाटिप्पणी सुद्धा होते , परंतू आपल्या हक्काच्या लढाईत बरेचदा मनावर च्या दडपणामुळे बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात त्याचप्रमाणे ह्या पत्रातील मागणीही तशीच दूर्लक्षीत राहुन जाते ,मग निवडणूक झाल्यानंतर लोकांची ,मतदारांची कुजबुज सुरु होते ,अरे मला माहितच नव्हते.म्हणुनच.....ह्या पत्राचे आयोजन.

मित्रांनो, 

आपणही आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांना खालील पत्र दाखल करा व मुख्य निवडणूक आयोगालाही मागणी करा

प्रति,       

       राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र,                 नवीन प्रशासन भवन पहिला मजला,           मादाम कामा रोड मुंबई ४०००३२


विषय :- लोकसभा उमेदवाराच्या गुन्ह्यांची तसेच एकूण संपत्ती ची माहिती मतदान केंद्रा बाहेर स्पष्टपणे लावन्याबाबत.

माननीय महोदय,

आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की अठराव्या लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये ४८ जागांसाठी एकूण पाच टप्प्यामध्ये होणार आहे.

यामध्ये अनेक पक्षाच्या उमेदवाराने खासदार पदासाठी अर्ज भरले असून अनेकांनी आपल्याकडे कागदपत्राची पूर्तता केलेली आहे.

्अनेक खासदार तसेच इतर उमेदवार यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आपण ज्यांना मत देणार आहोत तो उमेदवार खरोखर लोकप्रतिनिधी म्हणून निवडणे योग्य आहे का हा ठरविण्याचा अधिकार प्रत्येक मतदार राजाला आहे. प्रजा ही राजा आहे आणि या राजाच्या मतावर देशाचा कारभार चालतो जनतेचे मत आणि जनतेचा कर देश चालवतो. अनेक उमेदवारावर असणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार हे वेगवेगळे आहेत.

गंभीर गुन्हे, द्वेष पूर्ण विधान केल्याचे गुन्हे, खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे, महिला विषयी अपमान करणारे गुन्हे,खून करणारे गुन्हे, जातीय वाचक तेढ निर्माण करणारे गुन्हे. गुन्ह्यात दोषी केलेले उमेदवार,गुन्ह्यात शिक्षा झालेले उमेदवार,गुन्ह्यात दंड झालेले उमेदवार, तसेच त्यांच्याकडे असणारी एकूण संपत्ती जी त्यांनी प्रतिज्ञापत्र मध्ये दिली आहे.

अशा उमेदवारांची माहिती फ्लेक्स द्वारे मोठ्या अक्षरात मतदान केंद्राच्या बाहेर स्पष्टपणे लावावी जेणेकरून मतदानासाठी जाणाऱ्या मतदार राजाला ती माहिती स्पष्टपणे वाचूनयोग्य असा आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त होईल. आणि आपले पवित्र मतदान योग्य उमेदवाराला देण्यासाठी त्याला एक चांगली संधी मिळेल. आपल्या कार्यवाहीच्या प्रतीक्षेत.

आपला स्नेहांकित ,

आपले हे एक पत्र धनदांडग्यांच्या किंवा गर्भश्रीमंत उमेदवारांच्या वारेमाप पैशाच्या उधळणीवर लगाम लावण्यासाठी कारणीभूत ठरु शकते आणि गुंडगिरीचा नायनाट करता येवू शकतो..

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.