स्टेट बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र उद्घाटन सोहळा.
स्टेट बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा.
मूल, न्यूज ब्युरो.
बॅंक आणि कर्मचाऱ्यांचा भार कमी करीत ग्राहकांना २४×७ सेवा देता यावी यासाठी स्टेट बॅंकेच्या वतीने खाजगी प्रतिष्ठान वा व्यक्तींना अशी सेवा केंद्र चालविण्यासाठी देऊन उत्तम सेवा देण्याचा बॅंक व्यवस्थापन प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रगती काॅम्प्युटर ला हे सेवा केंद्र देण्यात आले आहे ,ह्याचा ग्राहकांना अतिशय लाभ होणार असून बॅंकेतील गर्दी कमी करण्यास व ग्राहक सेवेत सहकार्य होणार आहे.असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मूल शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांनी या सेवा केंद्राचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.
प्रेस क्लब मूल चे अध्यक्ष व ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे यांचे हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रगती काॅम्प्युटर संचालित ग्राहक सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला , याप्रसंगी स्टेट बँकेचे मूल शाखेचे व्यवस्थापक देशमुख प्रमुख अतिथी म्हणून तर सक्सेस कॉम्पुटर चे संचालक नितीन येरोजवार अतिथी म्हणून उपस्थित होते.
सर्व सामान्य ग्राहकांना सुटयांच्या कालावधी सह बॅंकिग वेळे व्यतिरिक्त ही बॅंकेच्या सेवेचा लाभ मिळणार असून सर्वसामान्यांना बचत खाते उघडणे, पेन्शन धारकांना पेन्शनचे पैसे काढणे,पैसे हस्तांतर करणे, विद्यार्थ्यांना बचत खाते उघडण्यापासून ते शिष्यवृत्तीचे पैशाचे व्यवहार,बचत गटातील अंतर्गत व्यवहार पैसे काढणे अथवा भरणे,थोडक्यात पैशाचे छोटया प्रमाणातील सर्व व्यवहार या ग्राहक सेवा केंद्रा मार्फत होणार असल्याने ग्राहकांना निश्चितच त्याचा लाभ होऊन त्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.
या सेवा केंद्रामार्फत केद्र शासनाच्या विविध साामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळण्यासाठी बॅंकेने पुढाकार घेतला असून केंद्रामार्फत अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, या योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे कार्यक्रमास स्टेट बॅंकेसह इतरही बॅंकेचे ग्राहक तसेच आधार केंद्र संचालक,विवेक मुनगेलवार ,पराग खोब्रागडे, आरती पांडे, आरती बंडीवार, ज्योती बाबरे मेश्राम, आँनलाईन केंद्र संचालक नरेश वैद्य, प्रगती काॅंम्यूटर संचालीका वैशाली मशाखेत्री , स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राचे संचालक प्रमोद मशाखेत्री ऑपरेटर मोनी गोंगले तसेच सर्वसामान्य नागरिक , ग्राहक , विद्यार्थी व महिला यांची उपस्थिती होती.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments
Post a Comment