निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....२.

  निवडणूक समरांगणातील लढवय्ये!....२.

गटातटाचे राजकारण आणि मतदार हा केंद्रबिंदू!

चौकात स्वागत!वाहतुकीची कोंडी???

दीपक देशपांडे 

 रविवार दिनांक ३१ मार्च रोजी  दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमात सरतेशेवटी वेळ काढून चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचारकार्यालयाचे मूल   तालुका उद्घाटनाच्या निमित्ताने काॅंग्रेसच्या  उमेदवार प्रतिभा धानोरकर मूल शहरात  दाखल  झाल्या तेंव्हा बहुचर्चित परस्पर विरोधी गटातील नेते मंडळी आपापसातील मतभेद आणि मनभेद विसरून एका मंचावर उपस्थित झाले होते! एकमेकांसोबत  बसले आणि आम्ही सगळेजण  सोबत आहोत हे दाखवण्यासाठी जी वक्तव्य  केली गेली तो प्रसंग उघड्या डोळ्यांनी पाहाणाऱ्या आणि ऐकणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता,म्हणजे तो धक्का बसला नसता तरच नवल होते,म्हणा, कारण काल कालपर्यंत एकमेकांना पाण्यात बघणारे आज मांडीला मांडी लावून बसले होते.

यामुळे एक झाले की,भाजपाच्या गोटात कमालीची अशांतता निर्माण होईल ही अपेक्षा होती , मात्र ती हवेतच विरली,कारण दोन विरोधी गट एका मंचावर विराजमान होण्यापूर्वी  एक गट एका विशेष प्रस्तावासह भाजपच्या तंबूत दाखल होण्यासाठी दारात धडक देऊन, भाजपाच्या जून्या निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी धुडकावून लावल्याने पर्याय उरला नाही म्हणून पुन्हा एकदा एका मंचावर विराजमान झाल्याची कुजबूज कानावर पडली, आणि मग काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील दोन्ही कडील कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (गांधी चौकातील चर्चा)

दुसरा एक गट मात्र भाजप उमेदवाराला ही खेळी महागात पडणार असल्याचे खात्रीपूर्वक विवेचन करीत होता,हेही लक्षात घेतले पाहिजे.

खरेखोटे हे राजकीयनेतेच जाणो.

आज असे पोस्टर झळकू लागले.
यानिमित्ताने मंचावर विराजमान नेत्यांची वक्तव्ये, प्रास्ताविकातून तालुका अध्यक्षांनी मांडलेला गोषवारा ,महाविकास आघाडीचे सरकार असताना केलेले कार्य , तालुक्यातील ग्रामपंचायत वर असलेले वर्चस्व आणि सहकारी सोसायट्यांवर संतोष रावत गटाचे वर्चस्व,कृउबास ताब्यात असणे यांचा उहापोह संतोष रावत यांचे तालुक्यातील राजकारणात किती महत्त्व आहे हे स्पष्ट करीत होते तर  शब्द तोलून मापून बोलणारे संतोष रावत यांचे वक्तव्य त्यांच्या  नियमीत शैलीची चमक दाखवत नव्हते, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या वक्तव्यात गटागटातील धुसफूस अजूनही संपलेली नाही हे लपवू शकत नव्हते म्हणून ते वारंवार आपापसातील हेवेदावे विसरून एकत्रितपणे काम करण्याची गरज प्रतिपादीत करीत होते  व मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान केंद्रावर पोहोचवण्याची आग्रही मागणी करीत होते, पहिल्या क्रमांकावर पंजा आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कमळ आहे हेही स्पष्टपणे सांगत पहिल्या क्रमांकाचे बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करीत होते.याचा काय अर्थ काढायचा तो मायबाप मतदार राजाला चांगलाच ठाऊक आहे.

प्रतिभा धानोरकर मात्र या मतदारसंघातून दुसऱ्यांदा एका महिलेला संसदेच्या सर्वोच्च सभागृहात आपल्या सेवेसाठी पाठविण्याची विनंती करतांना उमेदवारी मिळवण्यासाठी अकारण झालेल्या त्रासाचे शल्य लपवून ठेवू शकल्या नाहीत आणि तरीही झाले गेले विसरून येणारी निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई असल्याचे स्पष्ट करत  माझ्या उमेदवारी मुळे आणि  नामांकन अर्ज सादर करताना उसळलेल्या गर्दीमुळे  भाजपच्या उमेदवाराला १०२-१०३°ताप आल्याचे वक्तव्य करीतआपल्याला तळागाळातील  मतदारांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता स्पष्ट करीत सगळ्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला खासदार म्हणून निवडून देण्यासाठी पहिल्या क्रमांकावर असलेल्या पंजा या बोधचिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करतात.(कार्यकर्ते घोषणा देतातं)



यावेळी ईव्हीएम बाबत कुणाला शंका किंवा आक्षेप नाही ,हे मुद्दाम नमूद करुन ठेवणे गरजेचे व आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ऐन गांधी चौकात होणारा स्वागत समारंभ व गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि चौकात होणारी वाहतूक कोंडी हा विषय प्राधान्याने पुढे आला आहे.

तुर्तास इतकेच....

याबाबत पुढील घडामोडी घेऊन पुन्हा भेटूच...... पुढील भागात.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.