*अरे बाजार बाजारं,कुठे लावू पाल, अन् कुठून आणू पाण्याची घागरं?*

 *अरे बाजार बाजारं,कुठे लावू पाल, अन् कुठून आणू पाण्याची घागरं?*

अशाने कसे साकारणार स्वप्नातील सर्वोत्तम मार्केट यार्ड?

*दीपक देशपांडे*

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील नुकतेच लोकार्पण झालेल्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्केट यार्डातील समस्यांचा पाढा वाचला या मार्केट यार्डात आलेल्या शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि इतरांनी......


आज  मुद्दामच लवकरच नवीन आठवडी बाजारात महात्मा फुले बाजार यार्डात सुरुवातीला काय स्थिती असते हे बघण्यासाठी गेलो,असता, बाजार  यार्डात व्यवस्थेऐवजी तेथील दुरवस्थेची लक्तरेच उपस्थित शेतकरी, भाजी विक्रेते,ठोक विक्रेते आणि धान्य विक्रीसाठी आणणाऱ्या व्यावसायिक मंडळींनी आमच्यापुढे ठेवलीत.

नगरपरिषद कर्मचारी रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना उठवून लावतात,त्यांचे सामानसुमान जप्त करण्याच्या धमक्या देतात ,मात्र उत्पादक शेतकरी  ,व छोट्या मोठ्या अनियमित भाजी विक्रेते व ज्यांना जागेचे वाटपच झालेले नाही त्यांना बाजार यार्डात जागाच उपलब्ध होत नाही त्यामुळे आम्ही कुठे जावे आणि काय करावे,असा सवाल घेऊन भाजी विक्रेते बाजार यार्डात आक्रोश करीत होते.


मी बाजार यार्डात पोहोचताच त्यापैकी कुणीतरी ओळखीने माझ्याकडे आला आणि मला थांबवून आपली व्यथा सांगू लागला ,बघता बघता पाच पन्नास लोकांनी माझ्यापुढे आपल्याला भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचायला सुरुवात केली.

*काय होत्या समस्या?*

१.बाजार यार्डात पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

२.एवढ्या रणरणत्या उन्हात आम्ही भाजी विकायची कशी? कारण साधी पाल बांधायची म्हंटले तरी पाल बांधायला कुठलिही सोय नाही. बांबू उभे करु म्हंटले तर ते उभे करायचे कसे?

३.बांबू उभे करण्यासाठी पाईप टाकून ठेवणे आवश्यक होते ती सोय नाही , फोडून टाकू म्हंटले तर दंडात्मक कारवाईची भिती असल्याचे स्पष्ट करीत किमान प्रत्येक रांगेत पोल तरी उभे करणे गरजेचे होते तीही सोय नाही.

४.मोठ्या ठोक भाजी विक्रेत्यांना समोरच्या जागा वाटप झाल्यामुळे लहान भाजी विक्रेत्यांना आपला माल विक्री करताना अडचणीचे जाते.

५मार्केट बाजार यार्डच्या प्रवेशद्वारावर फळ विक्रेते गर्दी करतात परिणामी ग्राहकांची गर्दी वाढते व निश्चितच कोणत्या दिशेने जायचे ते ठरवता येत नाही,यांचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो.

६.कंत्राटदार ओट्यावर बसणाऱ्या कडून ८०₹ शुल्क घेतात तर साध्या शेतकऱ्यांकडून  व उघड्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांकडून ६०₹शुल्क आकारणी करतात तर आपल्या दुचाकीवरून एक दोन चुंगड्या भाजी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून किमान६०₹ते१००₹पर्यंत आकारणी केली जाते.ही वैध आहे कां?

७.बाजाराच्या मार्गावर बसणाऱ्या कापड व कपडे विक्रेत्यांचे बाजारात येणाऱ्या ग्राहकांना अडचणींना तोंड द्यावे लागत नाही का?

८.धान्य विक्री करणाऱ्या शेतकरी व व्यापारी यांचेसाठी निवडलेली जागा योग्य आहे काय?

९.शेतकऱ्यांना उपयुक्त औजारे,व रोपे ,बी,बियाणे विक्री करणारे यांचेसाठी केलेली जागेची निवड व जागा पुरेशी आहे काय?

१०, ओट्यावर बसून व्यापारी भाजीपाला विक्री करु शकतो काय?

आणि अशाच कितीतरी प्रश्नांची बरसात ही गोळा झालेली मंडळी आमच्यावर करीत होती ,

यांतून आमच्या एका ओळखीच्या फळविक्रेत्या व भाजी विक्रेत्यांनी इतर विक्रेत्यांना समजाऊन आमची या घोळक्यातून सुटका केली.


प्रश्न हा नाही की त्यांनी आमच्यासमोर हे प्रश्न मांडलेत प्रश्न हा आहे की प्रशासनाने , हे मार्केट यार्ड , आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्केट यार्ड तयार करताना ,त्यांचे बांधकाम ,रचना करताना कोणत्या मार्केट यार्डची संकल्पना पुढे ठेवून या मार्केट यार्ड चे बांधकाम केले की जे इथे वाटपानंतर पहिल्या दिवसापासून चर्चेचा विषय बनू बघत आहे आणि जसजसे दिवस पूढे सरकत आहेत तसतसे हा विषय अधिकाधिक गंभीर रुप धारण करीत आहे.


प्रशासनाचे कुठे चुकत आहे , कंत्राटदार आपली मनमानी वसुली कशी करीत आहे?सर्व सोयींनी युक्त मार्केट यार्डात पाण्याची सोय कां नाही? रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना मार्केट यार्डात कां सामावून घेता आले नाही? नियोजित जागे पेक्षा अधिक जागा बळकावून व्यवसाय थाटणाऱ्या  व्यावसायिक मंडळींवर कां कार्यवाही केली जात नाही?  उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी जागा राखून कां ठेवता आली नाही? 

प्रशासनाने कंत्राटदारांच्या वसुलीसाठी ठराविक रक्कम ठरवून देणे व ती बाजार यार्डात ठळकपणे प्रसिद्ध करणे आवश्यक नाही काय?

एक ना अनेक प्रश्न आहेत.अशाने......

मान.सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आणि त्यांच्या स्वप्नातील सर्वोत्तम मार्केट यार्ड हे वाक्य पूर्णत्वास नेता येणे शक्य आहे का?

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.