*शासकीय विश्रामगृहात बैलबंडीने रेती पुरवठा?*

 *शासकीय विश्रामगृहात बैलबंडीने रेती पुरवठा ?*

*दीपक देशपांडे*


महाराष्ट्र शासनाने रेतीघाटांची  लिलाव प्रक्रिया पूर्ण न केल्याने नदिघाटातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक सुरु असल्याच्या बातम्या एकीकडे ऐकायला मिळत आहेत तर सर्वसामान्य नागरिक रेतीमुळे बांधकाम रखडल्याची ओरड करीत आहेत ,यांत शासकीय योजनेचा लाभ घेत घरकूल उभारणारे गोरगरीब असतील नाहीतर आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा मध्यमवर्गीय नोकरदार असेल रेती सहजगत्या उपलब्ध होत नसल्याची तक्रार तरी करतोय किंवा रेतीच्या चढ्या भावामुळे बजेट कोलमडला अशी तरी ओरड नक्कीच करतो आहे.

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी यांचा फटका बसत असल्याचे ऐकिवात होते मात्र मूल येथील शासकीय विश्रामगृह परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी चक्क बैलबंडीने रेती मागवली जात आहे आणि हा प्रमुख चर्चेचा विषय ठरतो आहे.

कां?

मूल शहरालगतच्या उमा नदीच्या पात्रातून दररोज शेकडो बैलबंडीने रेतीचा उपसा राजरोसपणे होत असून यांत मोठं घबाड असल्याची चर्चा आहे ,मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की जाणुन बुजुन याकडे दुर्लक्ष केले जात आहे हा तितकाच चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे.


मात्र प्रचंड चढ्या भावाने रेतीपुरवठ्याची महत्वाची भूमिका हे गरीब बिचारे बैलबंडीचालक ? प्रामाणिकपणे भल्या पहाटेपासून रात्री  उशिरापर्यंत दिवसभर करीत आहेत आणि दिवसभराच्या किमान सहासात फेऱ्या मारत आहेत ,ही वास्तविकता कुणीही नाकारू शकत नाहीत. 

आतातर शासकीय व्यवस्थेतच जर अशाप्रकारे बैलबंडीने रेती मागवून काम केले जात असेल तर ......अजून काही सांगण्याची गरज नसावी.

याबाबींकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ आहे का?


शेवटी काय? *आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातय*.... असंच म्हणावं लागेल ना?


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.