*चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बंडू लडके यांची अविरोध फेरनिवड*

 *चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बंडूभाऊ लडके यांची अविरोध फेरनिवड*

दीपक देशपांडे 



चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची आम सभा जिल्हा मराठी पत्रकार संघ भवन, चंद्रपूर येथे मंगळवार दि.१२ मार्च २०२४ रोजी अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभे मध्ये वर्ष २०२४ ते २०२७ पर्यंतच्या नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी बंडूभाऊ लडके यांची सर्वानुमते  अविरोध निवड करण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बबनराव बांगडे यांची  निवड करण्यात आली होती,


जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ उमाकांत धोटे यांनी बंडूभाऊ लडके यांचेच नेतृत्वाखाली जूनीच कार्यकारिणी  कायम ठेवण्याची सुचना केली,त्याला मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम यांनी अध्यक्ष पदासाठी बंडू लडके यांचे नावाला अनुमोदन दिले  यावर सर्वांनी एकमताने सम्मती दिली आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रितसर बंडू लडके यांच्या निवडीची घोषणा केली.

उपस्थित सगळ्यांनी बंडूभाऊ लडके यांचे अभिनंदन केले,त्यानंतर बोलताना एक आठवड्यात नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल असे नवनिर्वाचित अध्यक्षांनी यावेळी जाहिर केले.


याप्रसंगी परिषद प्रतिनिधि मुरलीमनोहर व्यास, सरचिटणीस सुनील तिवारी, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, वैभव पलिकुंडवार, कोषाध्यक्ष मोरश्वर राखूंडे,दीपक देशपांडे, रवी नागपुरे, अनिल बाळसराफ, नामदेव वासेकर,षडाकांत कवठे,राजेश बारसागडे, सुरेश डांगे,अंबिकाप्रसाद दवे,मंगल जीवने,सूरज बोम्मावार,उदय गडकरी यासह मूल,सावली,राजूरा,बल्लारपूर,पोंभुर्णा,चिमूर, नागभीड , चंद्रपूर आदि विविध तालुका पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.