*'लाईनमन दिन’* महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलात साजरा

 *'लाईनमन दिन’* महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलात साजरा४.०३.२४

  चंद्रपूर, न्यूज ब्युरो 


राज्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या व जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचविणाऱ्या- वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या ' विजेला ' सुरळीत ठेवण्यासाठी विजपुरवठा अबाधित  ठेवण्यासाठी, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या विजक्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात तद्वतच महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील सर्व २९ उपविभागात साजरा करण्यात आला .

आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांना वीजसुरक्षेची शपथ देण्यात आली. - मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी सर्वांना लाईनमॅन दिनाच्या शुभेच्छा दिल्या देत. "महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहात ! जनमित्र हे ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास वर्षाचे ३६५ दिवस अविरत सेवा देतात.

       कधी,चंद्रपूरच्या कडकडते उन्ह अंगावर झेलत तर  पुरात पोहून जात, धो- धो पावसात कर्तव्य पार पाडतात.

चंद्रपूर जिल्ह्याच्या रानावनात, गडचिरोली जिल्हा यासारख्या दुर्गमातीदुर्गम -आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत महावितरणचे 'आधारस्तंभ '-जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आपले जीवनमान काळजी घ्या व  दुरुस्ती कामात सुरक्षेशी तडजोड करू नका.

 कारण तुमची वाट घरी तुमचा परिवार पाहत असतो तर, महावितरणसाठी, महावितरणचा तुम्ही महत्वाचा ' दुवा 'आहात ",असे ते म्हणाले.

मुख्य अभियंता यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले व  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक लाख  सोलर रूप टॉप चे लक्ष पूर्ण करण्याचे आवाहन केले.


     श्रीमती संध्या चिवंडे , अधीक्षक अभियंता चंद्रपूर प्रभागातील, कार्यकारी अभियंता श्री. दारव्हेकर, श्री वैदकर  सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रपूर परिमंडळ,  श्री सुशील विखार, वरीष्ठ व्यवस्थापक चंद्रपूर परिमंडळ हे उपस्थित होते.


       'लाईनमॅन', प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित, या  'लाईनमॅन-दिनी' उपविभाग १ अंतर्गत आपल्या सर्व लाडके अभियंते- वसंत हेडाऊ,  साहिल टाके, सुमेध खणके, मिथुन मेश्राम, टिकेश राऊत,  पराग हलमारे, रितेश ढवळे, प्रवीण शेंडे,  अतुल रोडगे यांचे प्रती  'लाईनमॅन' यांनी देखील प्रेम व्यक्त केले.


 सिरोंचा, मूल, गडचिरोली, कुरखेडा, जीवती, बल्लारशा, वरोरा व अनेक ठिकाणी लाईनमन दिनानिमित्त रॅली काढण्यात आली व सर्वांनी सुरक्षिततेची शपथ घेतली.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.