निवडणूक आचारसंहिता लागू, आचारसंहितेचे पालन करा विशालकुमार मेश्राम.

 निवडणूक आचारसंहिता लागू, आचारसंहितेचे पालन करा, सहायक  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम.

दीपक देशपांडे 


भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे . चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सुचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४  आचारसंचीतेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबाबत सभा दिनांक १७/०३/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता झाली.

     केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च ३०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १३ – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक १९एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी बल्हारपूर विधानसभा निवडणुक विभाग पूर्णपणे सज्ज आहे असे प्रतिपादन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय विशालकुमार मेश्राम यांनी केले.


उपविभागीय अधिकारी कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप  करताना मूल येथे  ते बोलत होते.  यावेळी मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे, पोंभूर्णाचे तहसीलदार शिवाजी जाधव, निवडणूक नायब तहसीलदार यशवंत पवार, प्रकल्प अधिकारी तथा निवडणूक आचारसंहिता नोडल अधिकारी निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी  मूल तालुका पत्रकार संघ ,प्रेस क्लब  मूल , व पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच प्रिटींग प्रेस धारक तालुका मूल आदी उपस्थित होते.

मतदार जनजागृतीकरीता स्वीप योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे,

बल्हारपूर विधानसभा मतदार संघात एकुण ३५७जूने मतदान केंद्र असून नवीन ४प्रस्तावित मतदान केंद्रासह ३६१मतदान केंद्रावर एकूण ३ लक्ष ९७८ मतदार : यात १ लक्ष ५३ हजार ९५६ पुरुष मतदार, १ लक्ष ४७ हजार १९स्त्री मतदार आणि तृतीयपंथी  ३ जणांचा समावेश आहे. 


८५ व त्यापेक्षा जास्त वय असलेले वयोवृद्ध  नागरिक २२४६ मतदार आहेत. तसेच मतदार संघात एकूण १८४२ दिव्यांग मतदार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वयोवृद्ध असणा-या मतदारांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारास गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारास फार्म १२ डी नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

या निवडणुकीत ४२१९ नवमतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाचा २४ × ७ कार्यरत राहणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रार निवारण / मदत कक्ष, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तक्रारी दाखल करता येणार आहेत. असेही याप्रसंगी विशालकुमार मेश्राम यांनी स्पष्ट केले.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.