आज जागतिक चिमणी दिन ! मूल शहरातील पक्षीमित्र राहूल आगडे जागवतोय पक्षी वाचवाचा जागर
आज जागतिक चिमणी दिन!
मूल शहरातील पक्षीमित्र राहूल आगडे जागवतोय पक्षी वाचवाचा जागर
आज जागतिक चिमणी दिन आहे. आज २० मार्च 'जागतिक चिमणी दिवस' जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. मात्र गावशिवारातून चिमण्या कमी होत चालल्या आहेत.
अशावेळी मूल नगरातील एक पक्षीमित्र राहूल आगडे स्वतः मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पक्षी जगले पाहिजेत यासाठी भरीव योगदान देत जनजागृती करीत पक्षांसाठी नवनवीन उपक्रम राबवित आहे.त्याच्याच प्रयत्नातून साकारलेल्या एका उपक्रमाची ही झलक......
World Sparrow Day 2024 :
आज जागतिक चिमणी दिन,
विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम *चिऊताई जगावी!*
आमचे मूल नगर झाडीपट्टी म्हणून गणल्या जाणाऱ्या जंगल परिसरात सभोवताली जंगल आणि डोंगरदऱ्या, नदीनाल्यांनी व्याप्त समृद्ध भूमीत वसलेले जागतिक किर्ती लाभलेल्या ताडोबा बफरझोन ला लागून असलेले मूल जि. चंद्रपूर हे शहर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर. मात्र दिवसेंदिवस शहरातील चिमण्यांची किलबिल आणि पक्षांचा किलबिलाट कमीकमी होत चालला आहे ,ही बाब हेरून शहरातील एका ध्येयवेड्या युवकाने, राहूल आगडे याने मागील बऱ्याच वर्षांपासून चिमणे पाखरे वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याने यावर्षी छोट्या छोट्या शालेय मुलांना हाताशी घेऊन हा उपक्रम राबविला आणि ह्या चिमणपाखरांना पक्षी संवर्धन आणि पक्षी संवर्धनाची आवश्यकता पटवून दिली.
आज जागतिक चिमणी दिनानिमित्त, विद्या मंदिर कॉन्व्हेंट मूल येथील विद्यार्थ्यांनी , राहूल आगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'चिमणी वाचवा-चिमणी जगवा या 'विशेष उपक्रमांतर्गत टाकाऊ पाण्याच्या बाटलीपासून आकर्षक असे जलपात्र तयार केले. याद्वारे या शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमण्यांच्या अन्न- पाण्याची सोय केली आहे.
विद्यार्थ्यांनी पाण्याच्या वाया गेलेल्या बाटल्या, रिकामे डबे, प्लास्टीकची झाकणे यांचा वापर करून चिमण्यांसाठी आकर्षक तयार करून चिमण्यांच्या दाण्या-पाण्याची सोय केली आहे. हे निवारा व जलपात्र परिसरातील झाडांवर, घरातील बाल्कनी, गच्चीवर ठेवण्यात आले. एकाच फिडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चिमण्यांच्या घटत्या संख्येचा विचार करता 'चिमणी वाचवा-चिमणी जगवा' हा अभिनव उपक्रम राबवला आहे.




Comments
Post a Comment