महसूल प्रशासन जनतेच्या दारात! लाभ घेण्याचे तहसीलदार मूल यांचे आवाहन.
महसूल प्रशासन जनतेच्या दारात! लाभ घेण्याचे तहसीलदार मूल यांचे आवाहन.
दीपक देशपांडे
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख ,कार्यक्षम,गतिमान व पारदर्शक करण्यासाठी शासननिर्णयाव्दारे सुचना निर्गमित करण्यात आलेल्या असून महाराजस्व अभियानाअंतर्गत भटक्या विमुक्त जाती व जमाती व आदिवासी जमातीच्या व्यक्ता ना विविध प्रकारचे प्रमाणपत्र व दाखले प्रदान करण्यासाठी आधार कार्ड,जातीचा दाखला उत्पन्न दाखला,मतदान कार्ड,राशन कार्ड इत्यादी दाखले निर्गमित करण्याकरीता मूल तालुक्यातील ताडाळा तुकुम,जुनासूर्ला, भेजगाव,गोलाभूज व सुशीदाबगाव या गावात दिनांक ०४/०३/२०२४ व दिनांक ०५/०३/२०२४ रोजी शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.
दिनांक ०४/०३/२०२४ रोजी गावाचे नाव ताडाळा तुकुम सकाळी 1१०ते १ ठिकाण:- ग्रामपंचायत कार्यालय ताडाळा तुकुम , भेजगाव दुपारी ३ते५ ग्रामपंचायत भवन भेजगाव, जुनासूर्ला दुपारी १ते ३ गावातील चावडीवर
तर....
दिनांक ०५/०३/२०२४ रोजी गावाचे नाव गोलाभूज सकाळी 1१०ते ०२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलाभूज येथे आणि सुशीदाबगाव दुपारी २ ते ५ जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सुशी दाबगाव येथे
भटक्या विमुक्त जाती व जमाती व आदिवासी जमातीच्या नागरीकांनी विविध प्रकारचे प्रमाणपत्र व दाखले काढून घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मृदुला मोरे तहसिलदार मूल यांनी एका पत्रान्वये कळविले आहे..


Comments
Post a Comment